Dainik Maval News : युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव, युवा नेते विश्वजीत बारणे यांचा वाढदिवस आरोग्य शिबिर, छत्री, वृक्ष वाटप, अन्नदान असा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना पिंपरी-चिंचवड शहर आणि सागर पाचार्णे आणि मेडीकव्हर हॉस्पीटल भोसरी आणि डी.वाय.पाटील हॉस्पीटल यांच्या सयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरात ९० दिवस विविध सोसायट्या मध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा अनेक जणांनी लाभ घेतला.
- थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे गार्डन येथे समस्त ३००० छत्र्यांचे वाटप करण्यात आले. डांगे चौक, थेरगांव येथे प्रशांत दळवी यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवसेना मावळ लोकसभा अध्यक्ष राजेंद्र तरस, शहर प्रमुख निलेश तरस, युवसेना शहर प्रमुख माऊली जगताप, जिल्हा प्रमुख युवती सेना शहर संघटीका सरिता साने आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॉयल इशाना सोसायटी येथे विशेष वृक्षवाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक जल्लोषाऐवजी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत या उपक्रमात नागरिकांना विविध प्रकारची फळझाडे आणि शोभिवंत वृक्ष वाटण्यात आले. सर्वांनी मिळून वृक्षारोपणाची जबाबदारी स्वीकारली. हा उपक्रम हरित परिसर निर्माण करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला. विश्वजीत बारणे यांनी थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे विद्यालयाला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सुजित कांबळे – (गणेश नगर) अक्षय परदेशी – (दुर्गा कॉलनी) संग्राम धायरीकर – (शिव कॉलनी) निखील इंगोले, सौरभ माळवकर – (मंगल नगर) अमित भोंडवे – (हायलाईफ सोसायटी) सुदर्शन जाडकर – (रुणवाल सोसायटी) महेश गोटे – (आनंद पार्क) संतोष गुलाब बारणे – (थेरगाव) रोहित बारणे – (दगडू पाटील नगर) रितू कांबळे – (थेरगाव) बाळा दळवी – (थेरगाव) मंदार येळवंडे – (दत्तनगर) सुरज बारणे – (थेरगाव) प्रशांत करडे – (गुजर नगर) विक्रम झेंडे – (हिरामण बारणे चाळ) सम्राट मित्र मंडळ व कार्याकार्तांनी केले.
चिंचवडमध्ये सामाजिक बांधिलकी जपत ‘अन्नदान’
वाढदिवसानिमित्त, सामाजिक बांधिलकी जपत विक्रम झेंडे यांच्या वतीने चिंचवड परिसरात अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळा, चिंचवड येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला. लोणावळा येथील अंध वृद्धाश्रमात फळांचे वाटप करण्यात आले. लोणावळा युवकचे अध्यक्ष विवेक भांगरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील सहा जिल्ह्यांसह पुणे घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट ; पवना धरणातून नदीपात्रात 4400 क्युसेक विसर्ग सुरू
– मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ कोसळलेली दगड, झाडी हटविली ; वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा
– सर्पमित्रांना स्वतंत्र ओळखपत्र, कुटुंबियांना १५ लाखांचा अपघाती विमा आदी मागण्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? श्रावण मासात उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख