Dainik Maval News : मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. महिलेच्या क्रेडिट कार्ड, लोन एप आणि बँक एप द्वारे महिलेच्या नावावर ११.८१ लाखांचे कर्ज घेत महिलेची फसवणूक केली. ही घटना १७ नोव्हेंबर २०२४ ते १७ जानेवारी २०२५ कालावधीत शिरगाव येथे घडली.
राकेश रवीकुमार शेट्टी (दक्षिण कन्नडा, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शिरगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी (२४ जुलै) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची आरोपी शेट्टी याच्यासोबत एका मेट्रोमोनीयल साईटवर ओळख झाली. शेट्टी याने महिलेला मेसेज आणि फोन करून ओळख वाढवली.
त्यानंतर महिलेसोबत लग्न करणार असल्याचे भासवून आरोपीने महिलेच्या क्रेडिट कार्ड, लोन ऍप आणि बँकेच्या ऍप मधून ११ लाख ८१ हजार ७५१ रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर महिलेसोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील सहा जिल्ह्यांसह पुणे घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट ; पवना धरणातून नदीपात्रात 4400 क्युसेक विसर्ग सुरू
– मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ कोसळलेली दगड, झाडी हटविली ; वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा
– सर्पमित्रांना स्वतंत्र ओळखपत्र, कुटुंबियांना १५ लाखांचा अपघाती विमा आदी मागण्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? श्रावण मासात उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख