Dainik Maval News : चाकण चौक तसेच चाकण एमआयडीसी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. मंत्रालयात चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत उपाययोजना राबवण्याविषयी बैठक झाली त्यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले बोलत होते.
नाशिक फाटा ते खेड रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास द्यावयाची पत्राची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना देऊन मंत्री भोसले म्हणाले की, एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे एमआयडीसीने भरावेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे नियोजन करावे.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून अस्तित्वातील रस्त्यावर आणखी एक मार्गिका तातडीने सुरू करावी. एमआयडीसीने त्यांचा ७५ मीटर रुंदीचा रस्ता तातडीने पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांची कामेही तातडीने करून वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावीत.
तळेगाव, चाकण, शिक्रापूर मार्गाच्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती देऊन काम करावे अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश आणि चावी वाटपाचा भव्य सोहळा संपन्न । Maval News
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट
– पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव-चाकण-उरुळी हे दोन रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार
– श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप