व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश आणि चावी वाटपाचा भव्य सोहळा संपन्न । Maval News

गरजूंचे घरकुलाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा गौरव

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 28, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
distributing house orders keys under Pradhan Mantri Awas Yojana was held at Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत नव्याने मंजूर घरकुल लाभार्थ्यांना आदेश वाटप, तसेच पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या व नेमप्लेट वाटपाचा भव्य सोहळा आज (सोमवारी), वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात आणि मोठ्या थाटात पार पडला.

ही योजना म्हणजे केवळ चार भिंतींचं बांधकाम नसून, गरजू कुटुंबांच्या घरस्वप्नांची पूर्ती करणारा आश्वासक उपक्रम असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. आपल्या स्वतःच्या घराची चावी हाती घेताच अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य व डोळ्यांतून अश्रू ओघळताना दिसून आले. काही लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की, “वर्षानुवर्षे घराच्या प्रतीक्षेत होतो, मात्र आज शासनाच्या या योजनांमुळे आमचं आयुष्यच पालटलं आहे.”

‘मावळ पॅटर्न’ जिल्ह्यासाठी आदर्श ठरावा – जिल्हाधिकारी डुडी
या कार्यक्रमात उपस्थित जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हटले की, “या योजनेचा आदर्श ‘मावळ पॅटर्न’ आपण मावळात बनवूयात व त्याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करूयात,” असे आवाहन त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना केले.

११० नवीन लाभार्थ्यांना आदेश, १२७ कुटुंबांना चाव्यांचे वितरण
या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६६, रमाई आवास योजना अंतर्गत ३४ आणि यशवंत आवास योजना (ठाकर समाज) अंतर्गत १० अशा एकूण ११० नव्या लाभार्थ्यांना घरकुल आदेश देण्यात आले. याशिवाय, आतापर्यंत १२७ लाभार्थ्यांना त्यांच्या पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या व नेमप्लेट्स देण्यात आल्या.

गायरान व खाजगी जमिनींवर घरकुलासाठी जागा वाटप
या कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीच्या वाटपाचा होता. मावळ तालुक्यात प्रधानमंत्री जन मन घरकुल योजनेअंतर्गत २५९ आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १२२ लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर घरकुल बांधणीसाठी ७/१२ उतारे वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे कोटमवाडी येथील काही लाभार्थ्यांना वनविभागातून तर शिवली, कुणे नामे व ओव्हळे गावांतील लाभार्थ्यांना खाजगी जमीन मालकांनी सामाजिक जाणिवेतून बक्षीसपत्राद्वारे जागा उपलब्ध करून दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामपंचायती, प्रशासन, पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास अधिकारी व घरकुल प्रकल्प विभाग यांनी समन्वय साधून भरीव कामगिरी बजावली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, प्रकल्प संचालक शालिनी कडू, तहसिलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्यासह मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी, सरपंच, पंचायत सदस्य व लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांची मोठी उपस्थिती होती.

या कार्यक्रमाने मावळ तालुक्यातील शेकडो कुटुंबांना नवजीवन देत, ‘घरकुल’ हे केवळ बांधकाम नसून समाजासाठीचा एक सकारात्मक बदल आहे, हे अधोरेखित केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– धक्कादायक! लोणावळा शहरात एका युवतीवर कारमध्ये विविध ठिकाणी सामुहिक बला’त्कार, एक आरोपी अटकेत । Lonavala Crime
– मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी कागदपत्रे पडताळणीनंतर ठरल्या ‘नावडत्या’
– लग्नाचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख 81 हजारांची फसवूणक; मावळमधील घटना, गुन्हा दाखल । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव-चाकण-उरुळी हे दोन रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार

Next Post

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval MP Shrirang Barne demanded inclusion of Dehuroad Cantonment Board in Pimpri-Chinchwad Municipal Corporation

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.