Dainik Maval News : वडगाव मावळ शहरातील केशवनगर भागात बुधवारी (दि. 6 ) सायंकाळी चार ते पाच भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रियांशू पवन गायकवाड (वय ८ वर्षे, रा. केशवनगर) असे गंभीर जखमी झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे. तिच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रियांशू ही बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास क्लासला जात असताना रस्त्यात चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला.
हल्ल्यात तिच्या पाठीवर गंभीर जखमा व मोठा रक्तस्राव झाला व ती बेशुद्ध पडली. जवळच्या इमारतीमधील काही रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी धावत जाऊन तिला श्वानांचा तावडीतून सोडवले व रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान या भागातील प्रवीण ढोरे, पंढरीनाथ ढोरे, संतोष निघोजकर, अक्षय बेल्हेकर, विनय लवंगारे, गणेश झरेकर, सचिन वाडेकर, प्रकाश चिवटे, सचिन निघोजकर, विकास कदम, तानाजी धडके, अतुल ढोरे आदींनी वडगाव नगरपंचायतीकडे याबाबत निवेदन दिले आहे.
वडगाव शहरामध्ये भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. सामान्य नागरिक व लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. केशवनगर भागामध्ये शाळकरी मुलीवर झालेल्या हल्ल्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी नगरपंचायतीने काळजी घ्यावी व वडगाव शहरातील सर्व भटक्या श्वानांच्या लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या