Dainik Maval News : मावळ–मुळशी तालुक्यातील धामणे, सांगवडे, गोडुंब्रे, दारुंब्रे, साळुंब्रे व नेरे या गावांमध्ये प्रस्तावित टी.पी. स्कीम व रिंग रोड प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांचा असलेला तीव्र विरोध आणि त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगवडे येथे बैठक आयोजित करण्यात आली.
आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत गावोगावच्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न, आक्षेप व भावना मांडल्या. हा प्रकल्प शेतक-यांच्या संमतीशिवाय राबवला जाऊ नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देताना त्यांच्या सर्व मागण्या गांभीर्याने घेतल्या जातील. तसेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत थेट शेतकऱ्यांची बैठक आयोजित करून हा मुद्दा चर्चेसाठी मांडला जाईल, असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले.
यावेळी आमदार शेळके यांनी शेतकऱ्यांना शाश्वती दिली की, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प कधीही राबवला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा हक्काचा लढा लढला जाईल, असेही यावेळी ठामपणे नमूद करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजपुरी, जांभूळ, साते, मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी येथे प्रशांत भागवत यांचे जल्लोषात स्वागत ; इच्छूक उमेदवार म्हणून दणदणीत प्रतिसाद
– गणेशोत्सवातून तरूणाईची होणारी एकजूट सामाजिक विकासासाठी गरजेची – एसीपी विकास कुंभार
– देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश