व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

महापालिका, एनएचआयच्या अधिकाऱ्यांसह खासदार बारणेंकडून रस्त्याची पाहणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 3, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Immediately fill potholes on service road of Mumbai-Bengaluru highway MP Shrirang Barne directs

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौक आणि मुंबई-बंगळुरू महामार्गावरील (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील किवळे समीर लॉन्स, ताथवडे, पुनावळे चौक, वाकड, भूमकर वस्ती या रस्त्याची मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (दि. 2 सप्टेंबर) अधिकाऱ्यांसह पाहणी केली. सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. किवळे ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत 8.3 किलोमीटर अंतरावर ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची (उन्नत मार्ग) निर्मिती करण्यात येणार आहे. या साडेपाच हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला महिन्याभरात मान्यता मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून मुंबई-बंगळुरू महामार्ग जातो. वाकड भूमकर चौक, ताथवडे व पुनावळेतील अंडरपास, किवळेतील मुकाई चौक आणि देहूरोड येथील सेंट्रल चौकात अनेकदा वाहतूक कोंडी होते. ती सोडविण्यासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉर’ मार्ग उभारण्यात येणार आहे. खासदार बारणे यांनी देहूरोड बाय पास जंक्शन ते वाकड चौक सेवा रस्त्याची पाहणी केली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचआय) प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता देवण्णा गट्टूवार, कार्यकारी अभियंता सुनिल पवार, कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे, सहायक संचालक नगररचना संदेश खडतरे, शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, युवासेना मावळ लोकसभा प्रमुख राजेंद्र तरस उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी देहूरोड वाय जंक्शन ते किवळे समीर लॉन्स, ताथवडे, पूनावळे चौक, वाकड, भूमकर चौकात जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारीं आहेत. ते खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश खासदार बारणे यांनी दिले.

  • खासदार बारणे म्हणाले, महामार्गाच्या दोन्ही बाजूला एनएचआय 12 मीटर सेवा रस्ता विकसित करणार आहे. जागेचे भूसंपादन झाले आहे. काही ठिकाणी महापालिकेच्या स्ट्रॉम वॉटरचे आउटलेट रस्त्यावर जात आहेत. त्यामुळेही खड्ड्यात भर पडली आहे. त्यामुळे आउटलेट तत्काळ वळवावे. उड्डाणपूल करण्यासाठी देहूरोड वाय जंक्शनचा भाग एनएचआयला हस्तांतरित करण्याबाबत एमएसआरडीसीला निर्देश दिले आहेत. सेवा रस्त्यावरील अंडरपासची रुंदी वाढवावी. कर्व्ह व्यवस्थित काढून द्यावेत. आराखडा तयार करून काम करावे. नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये, अशा सूचनाही खासदार बारणे यांनी दिल्या.

किवळे ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत 8.3 किलोमीटर अंतरावर ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौक आणि मुंबई-बंगळुरू महामार्गावरील (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) किवळे मुकाई चौक, पुनावळे, ताथवडे, वाकड येथील भूमकर व भुजबळ चौकातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. किवळे ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत 8.3 किलोमीटर अंतरावर ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची (उन्नत मार्ग) निर्मिती करण्यात येणार आहे. हा ‘कॉरिडॉर’ केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयाच्या माध्यमातून केला जात आहे. साडेपाच हजार कोटी रुपयांच्या ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ला महिन्याभरात केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.

एलिव्हेटेड कॉरिडॉर बालेवाडीपर्यंत जाणार आहे. पुनावळे, ताथवडे,हिंजवडीतून कॉरिडॉर जाणार आहे. या भविष्यात वाहतूक कोंडी होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये यानुसार नियोजन करावे. मार्गावरील अंडरपासची रुंदी जास्त असावी. कर्व्ह असावे. महापालिकेच्या विकास आराखड्यात जेवढे रस्ते आहेत. तेवढेच अंडरपास ठेवण्यात यावेत. – श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजपुरी, जांभूळ, साते, मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी येथे प्रशांत भागवत यांचे जल्लोषात स्वागत ; इच्छूक उमेदवार म्हणून दणदणीत प्रतिसाद
– गणेशोत्सवातून तरूणाईची होणारी एकजूट सामाजिक विकासासाठी गरजेची – एसीपी विकास कुंभार
– देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश


dainik maval jahirat

Previous Post

प्रस्तावित टी.पी. स्कीम व रिंग रोड प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय राबविला जाणार नाही – आमदार सुनील शेळके

Next Post

मोठी बातमी ! पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune to Lonavala Railway Route Third and Fourth Rail Track Project

मोठी बातमी ! पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.