Dainik Maval News : मावळ, खेड, शिरूर या तालुक्यांना जोडणारा तळेगाव – चाकण – शिक्रापूर हा रस्ता आता रस्ता नसून जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. जागोजागी खड्डे, चिखल, अरूंद मार्ग, अतिक्रमणांनी वेढलेला हा रस्ता नित्याने प्रवास करणाऱ्या प्रवासी, कामगार, विद्यार्थी, सामान्य नागरिकांसाठी काळ हून वेगळा नाही. ह्या रस्त्याच्या विकासासाठी शासनाने निर्णय घेतला असला तरीही तो प्रत्यक्षात उतरण्यास बराच अवधी जाणार, तोपर्यंत खड्डेयुक्त रस्त्यामुळे सामान्यांचे हाल हे होतच राहणार. अशा परिस्थितीत तळेगाव – चाकण – शिक्रापूर रस्त्याची दुर्दशा सांगणारे एक गीत अक्षय लांडे या गीतकाराने रचले असून गायक शनेश खजिरे याने ते गायले आहे. हे गीत सध्या व्हायरल होत आहे.
वाचा संपूर्ण गीत ;
“कामाव येताना माघारी जाताना, चाकण रस्त्यांवरी…
चिखल वाट नि पाऊस पाणी हा खेळ कुठवरी,
ट्रॅफिक आणि ह्या खड्ड्यांचे घेऊन ओझे तू जीवावरी…
वाट पाही घरी बायका पोरं तु
आठव गझाल कालची रे,
तुलाच काळजी रे तुझी तुलाच काळजी रे !
काय आजकालचे हे, नेते वर खालचे हे,
लाज ना कशाची ,न भय कुठले…
खाऊनी तुपात रोटी, देऊनी आव्हाने खोटी,
माणसाच्या रूपी हैवान भेटले…
खळगी पोटाची भरण्या निघता सोडून वाऱ्यावं घरं,
दिवस माझा, की शेवट जिवाचा
समदंचं नशिबावरं
शाप जणू हा कर्माला
नि माणुसकीच्या धर्माला ..
उगीच वेगाने गाडीच्या निष्पाप
जीव तू घेऊ नको,
होऊ दे झालातं उशीर जरासा
घाई तू करू नको,
ट्रॅफिक काल नी, आज ही, उद्या ही,
धीर तू सोडू नको,
वाट पाही घरी बायका पोर तू
आठव गझाल कालची रे…
तुलाच काळजी रे, तुझी तुलाच काळजी रे !”
गीत : तुलाच काळजी रे
गीतकार : अक्षय लांडे
गायक : शनेश खजिरे
पाहा गीत :
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ; राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे आवाहन
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित