Dainik Maval News : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) शेरे, सांगवडे, दारूंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे आणि धामणे गा गावांतील प्रस्तावित नगररचना योजना तसेच ६५ मीटर रुंदीचा रिंगरोड (नेरे-उर्से) हे दोन्ही प्रकल्प अन्यायकारक असल्याचे सांगत ते तत्काळ रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी शेतक-यांनी पीएमआरडीएत नुकतेच ठिय्या आंदोलन केले होते.
यानंतर माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीला नगररचना संचालक अविनाश पाटील व सहसंचालक नगररचना श्वेता पाटील उपस्थित होते.
भेगडे म्हणाले, या प्रकारांमुळे अंदाजे २१०० एकर बागायती शेतीचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारे हे प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही.
सदर प्रकल्पांमुळे शेती, बागायती क्षेत्र आणि भविष्यातील व्यवसाय धोक्यात येणार असल्याने गावांचा विकास नव्हे तर -हास होईल, असे शेतक-यांचे म्हणणे होते. शेतकऱ्यांशी संवाद साधून पीएमआरडीए प्रशासनाने प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
प्रकल्प रद्द होत नाहीत, तोपर्यंत विरोध सुरू ठेवण्याचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला. दरम्यान,प्रशासनाने यावेळी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत त्यांचे मागणे शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. तसेच समन्वयाने तोडगा काढण्याची भूमिका मांडली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News
