Dainik Maval News : देहूगाव-देहूरोड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले, यावेळी बाळा भेगडे यांच्या समवेत स्थानिक नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
देहूगाव ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दूरवस्था झाली आहे. या वर्दळीच्या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. झेंडे मळा ते हगवणे मळा, काळोखे मळा, देहूरोड डीएडी ते देहूगाव या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.
रस्त्याची दूरवस्था झाली असल्याने तसेच खड्ड्यांत चिखल राडारोडा होत असल्याने दुचाकी वाहने घसरतात, तर चारचाकी वाहन चालकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच येथील शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल बाजारात घेऊन जाताना याच मार्गाचा वापर करावा लागतो, यांसह विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यावसायिक यांच्यासाठीही हा प्रमुख मार्ग असल्याने त्याची तत्काळ दुरुस्ती व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र देहू येथे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात, मात्र रस्त्याची दुरावस्था झाल्याने भाविकांमध्ये देखील नाराजीचा सूर पाहिला मिळत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून या समस्येचे गांभीर्य ओळखून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन देहूगाव – देहूरोड रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News