Dainik Maval News : शिव विद्या प्रतिष्ठान व सन्मान सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि एकी महिला अधिकार संगठन यांच्या पुढाकाराने महिला बचत गट सदस्य व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड काढण्यासाठी कामशेत येथील सम्यक बुध्द विहार, भीमनगर येथे (दि. 10) आरोग्य जागृती व शिबिर आयोजित करण्यात आले होते.
महिला आरोग्य तपासणी, कुटुंबाचे आरोग्य कार्ड, सरकारी योजना, आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे सर्वसाधारण कुटुंबांसाठी असलेले महत्त्व या बाबत मार्गदर्शन गरजू कुटुंबाना मिळावे म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, असे संस्था प्रमुख संतोष वंजारी यांनी नमूद केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र कामशेत येथील सुपरवायझर रूपाली सुतार, चंद्रकला आनंदे, आशावर्कर करूणा कदम, शोभा सोनवणे आणि हक्क दर्शक संस्था प्रतिनिधी मानसी जगनाडे, किर्ती तिकोणे, अश्विनी मोढवे व रेखा मुळे यांचे बहुमोल सहकार्य या आरोग्य शिबिराला मिळाले, असे संगठन प्रमुख रेश्मा गायकवाड यांनी नमूद केले.
कामशेत आरोग्य आशा वर्कर टीमने एकी संगठन व बचत गट सदस्यांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड ऑनलाईन तयार करून दिले, उपस्थित सर्वांचे शुगर, बीपी, हिमोग्लोबिन, ताप इत्यादी तपासणी केली, असे संगठन लीडर माया वंजारी यांनी सांगितले.
संस्था व संगठन यांच्या माध्यमातून विविध गावांमध्ये मार्गदर्शन व आरोग्य शिबिरे आयोजित केली जात असून पुढील काळातही असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे संस्था विश्वस्त शिल्पा कशेळकर यांनी सांगितले.
एकी महिला अधिकार संगठन लिडर्स सारिका सोनवणे, अंजूम सय्यद, तसेच संगठन सदस्य मालन सय्यद, राधा गायकवाड, तृप्ती रोकडे, प्रिया रोकडे, करिष्मा शिंदे, रूपाली घोडके, पल्लवी सुतार, सविता उनवणे यांनी आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News