Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किशोर सावंत यास धमकावल्याप्रकरणी नितीन मराठे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी आता नितीन मराठे यांनी देखील पोलिसांत अर्ज दिला असून परस्पर तक्रार अर्ज शिरगाव पोलिसांत दाखल झाले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे नितीन मराठे यांनी दैनिक मावळला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
किशोर सावंत यानी फेसबूकवर माझे नाव टाकून कमेंट केली, तसेच कारण नसताना माझी बदनामी केली. ज्या रस्त्याचा त्याने उल्लेख केला, तो माझ्या माध्यमातून झालेला नसतानाही चुकीच्या माहिती आधारे त्याने कमेंट केली, ज्याबद्दल मी त्याला विचारणा करण्यासाठी त्याच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्याने माझ्यावर व माझ्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांवर शिवीगाळ केली व अंगावर धावून आला, याप्रकरणी मी शिरगाव पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे, अशी प्रतिक्रिया नितीन मराठे यांनी दिली.
दरम्यान याबाबत शिरगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय शेख साहेब यांची प्रतिक्रिया घेतली असता, दोन्ही बाजूचे तक्रार अर्ज आले असून त्याबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असल्याचे सांगितले.
नितीन मराठे हे भारतीय जनता पार्टीचे वरीष्ठ नेते असून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. आजवर आपण कुणावरही अन्याय केला नाही. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याविरोधात चुकीचे वर्तन केले नाही. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्यासाठी केलेले हे कृत्य असल्याचे मराठे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल