व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न ; युवकाला धमकावल्याप्रकरणी दाखल तक्रारीवर नितीन मराठे यांची प्रतिक्रिया

खोटी तक्रार करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न, मी देखील तक्रार दाखल केली आहे - नितीन मराठे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 4, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Former Zilla Parishad member Nitin Marathe in trouble case registered for threatening a youth shirgaon police

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किशोर सावंत यास धमकावल्याप्रकरणी नितीन मराठे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी आता नितीन मराठे यांनी देखील पोलिसांत अर्ज दिला असून परस्पर तक्रार अर्ज शिरगाव पोलिसांत दाखल झाले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे नितीन मराठे यांनी दैनिक मावळला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

किशोर सावंत यानी फेसबूकवर माझे नाव टाकून कमेंट केली, तसेच कारण नसताना माझी बदनामी केली. ज्या रस्त्याचा त्याने उल्लेख केला, तो माझ्या माध्यमातून झालेला नसतानाही चुकीच्या माहिती आधारे त्याने कमेंट केली, ज्याबद्दल मी त्याला विचारणा करण्यासाठी त्याच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्याने माझ्यावर व माझ्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांवर शिवीगाळ केली व अंगावर धावून आला, याप्रकरणी मी शिरगाव पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे, अशी प्रतिक्रिया नितीन मराठे यांनी दिली.

दरम्यान याबाबत शिरगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय शेख साहेब यांची प्रतिक्रिया घेतली असता, दोन्ही बाजूचे तक्रार अर्ज आले असून त्याबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असल्याचे सांगितले.

नितीन मराठे हे भारतीय जनता पार्टीचे वरीष्ठ नेते असून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. आजवर आपण कुणावरही अन्याय केला नाही. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याविरोधात चुकीचे वर्तन केले नाही. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्यासाठी केलेले हे कृत्य असल्याचे मराठे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल 


Previous Post

मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

Next Post

देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
land of temple

देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.