व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ

गेली अनेक महिने जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांचे स्वप्न सोमवारच्या आरक्षण सोडतीनंतर भंगले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 13, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
post of president remained out of reach Upheaval in Maval politics after Pune Zilla Parishad Group Reservation

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नजरेच्या टप्प्यात आल्या आहेत. यात सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीचा दिवस सोमवारी उजाडला. मावळ पंचायत समितीच्या दहा गणांची आरक्षण सोडत वडगाव येथे पार पडली. तर, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत पार पडली. दरम्यान गण आणि गट यांच्या आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

गेली अनेक महिने जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांचे स्वप्न सोमवारच्या आरक्षण सोडतीनंतर भंगले आहे. यात विशेष म्हणजे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी अर्थात खुल्या प्रवर्गासाठी असल्याने मावळातील अनेक दिग्गजांनी थेट जिल्हा परिषद सदस्य होण्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी कंबर कसली होती. परंतु सोमवारी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष होणे तर दूर पण सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले आहे.

मावळमधील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मावळ तालुक्यात असणाऱ्या पाच गटांपैकी तीन गटांत महिला आरक्षण पडले आहे. तर उर्वरित एक गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निश्चित झाला असून अन्य एक गट सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहिला आहे.

मावळमधील गटनिहाय आरक्षण
टाकवे-वडेश्वर गट : अनुसूचित जमाती
इंदुरी- वराळे गट : सर्वसाधारण महिला
खडकाळे – कार्ला गट : सर्वसाधारण महिला
कुसगाव – काले गट : सर्वसाधारण
सोमाटणे – चांदखेड गट : सर्वसाधारण महिला

इच्छुकांकडून आता पत्नीच्या तिकीटासाठी जोर
स्वतःचे जिल्हा परिषद सदस्य होणे हुकल्यानंतर आता बहुतांश गटातील इच्छुक उमेदवारांनी आरक्षण पाहून आपल्या पत्नीचा चेहरा उमेदवार म्हणून समोर केला आहे. अनेक गटांत हीच परिस्थिती असून आयत्यावेळी केलेला खर्च आणि आजवर केलेली धावपळ वाय न घालविता, रिंगणातून बाहेर पडण्याऐवजी पत्नीला निवडणुकीच्या रिंगणांत उतरविण्याची तयारी हिरमोड झालेल्या इच्छुकांकडून करण्यात आली आहे. तसेच पत्नीच्या तिकीटासाठी जोरही लावला जात आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव
जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा


Previous Post

गहूंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलला विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानकडून ‘पुणे जिल्हा शिक्षा पुरस्कार 2025’ प्रदान

Next Post

वडगावमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक ! आरक्षण सोडतीनंतर होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा, आगामी निवडणुकांसाठी मोठ्या निर्णयाची शक्यता

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Nationalist Congress Party Ajit Pawar group rally at Vadgaon Maval MLA Sunil Shelke present

वडगावमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक ! आरक्षण सोडतीनंतर होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा, आगामी निवडणुकांसाठी मोठ्या निर्णयाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet Accident Car catches fire on flyover on old Pune-Mumbai highway One dies of burns

Kamshet Accident : कामशेत येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूलावर कारला भीषण आग ; एकाचा होरपळून मृत्यू

May 5, 2026
PMRDA budget of Rs 4 Thousand 628 crore approved PMRD should prepare structural plan said CM Fadnavis

PMRDA च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी ; ‘पीएमआरडीए’ने सहा महिन्यात संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री

May 5, 2026
electricity problem in Maval will be solved Planning for electricity supply in Maval constituency has begun

मावळमधील विजेची समस्या सुटणार ; पुढील २० वर्षात होणारी वाढ लक्षात घेऊन मावळ लोकसभा क्षेत्रात वीज पुरवठ्याचे नियोजन

May 4, 2026
Youth-Drowned

मावळमधील हृदयद्रावक घटना ! पवना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

May 4, 2026
Elderly woman seriously injured in bee attack in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी

May 4, 2026
drowning

लोणावळ्यातील बेपत्ता ‘यश’चा वलवण धरणात बुडून मृत्यू

May 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.