Dainik Maval News : पिंपरी – चिंचवड शहरातील विविध सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या युवा सामाजिक कार्यकर्ता नकुल आनंदा भोईर (वय ४०) यांचा मध्यरात्री खून करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी चैताली (वय २९) हिनेच पोलिसांना फोन करून आपण खून केल्याचा सर्व घटनाक्रम सांगितला.
पोलिसांनी तिला ताब्यात घेतेले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे माणिक कॉलनी, चिंचवडगाव परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. मध्यरात्री नकुल भोईर आणि त्याच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. भोईर हे पत्नीच्या चारित्रावर कायम संशय घेत होते. मध्यरात्री तिने कपड्याच्या सहाय्याने गळा आवळून खून केला, अशी माहिती समोर येत आहे.
भोईर पती-पत्नी दोघेही महापालिका निवडणुकिसाठी इच्छुक होते. दोनच दिवसांपूर्वी चिंचवड मोरया गोसावी मंदिराशेजारी पाडवा निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले होते. मोठ मोठे पोस्टर आणि होर्डींगमधून चैताली भोईर यांचा प्रचारही सुरू केला होता. नदी सुधार प्रकल्प विरोधातील चळवळीत या सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकार होता.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगावचे नवीन पोलीस निरिक्षक अभिजित देशमुख यांची धडाकेबाज कामगिरी ; डोणे गावातील अवैध दारूभट्टी केली उध्वस्त
– मुरलीधर मोहोळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर… काय आहे किस्सा ? वाचा सविस्तर । Murlidhar Mohol
– भरधाव वॅगनर कारच्या धडकेत गंभीर जखमी होऊन 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; शिरगाव पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल



