व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

येत्या पंधरा दिवसांत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ११ हजार कोटींचे वितरण ; आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 29, 2025
in महाराष्ट्र, देश-विदेश
Maharashtra Cabinet Devendra Fadanvis

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ ४० लाख शेतकऱ्यांना होतो आहे. आणखी ११ हजार कोटी रुपये वितरित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ही मदत पुढच्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी ११ हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. पुढील १५ दिवसांत ही मदत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान ९० टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या, तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे, त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी तपासून उर्वरित 10 टक्के शेतकऱ्यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणीही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावू नये, यासाठी ई-केवायसी केली जात आहे. अ‍ॅग्रीस्टॅकचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांची पुन्हा ई-केवायसी केली जात नसून सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा – मुख्यमंत्री फडणवीस
शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अशा नोंदणीमुळे पारदर्शकता आली असून आता शेतकऱ्यांना हमी भाव मिळत आहे. यापूर्वी व्यापारी शेतकर्‍यांकडून कमी दराने माल घेवून शासनाला जास्त दराने विकला जात असे. नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रावर किंवा शासनाने जाहीर केलेला हमी भावाप्रमाणे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच मालाची विक्री करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर


dainik maval jahirat

Previous Post

लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा… । Mazi Ladki Bahin Yojana

Next Post

मोठी बातमी ! इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी होणार – वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

मोठी बातमी ! इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी होणार - वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.