व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत निवडणूक : NCP कडून अबोली ढोरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर ; सुनिता कुडे यांनाही मिळणार संधी

अबोली ढोरे यांना पहिली संधी तर सुनिता कुडे यांना दुसरी संधी देण्यात येईल, असे पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 14, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Vadgaon Nagar Panchayat NCP to contest on its own Will announce 17 corporator and 1 mayoral candidate

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला पहिला उमेदवार ( दि. 14 ) जाहीर केला. यामध्ये माजी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या पत्नी अबोली ढोरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अबोली ढोरे यांना पहिली संधी तर सुनिता कुडे यांना दुसरी संधी देण्यात येईल, असे पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वडगाव नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढविणार असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अबोली मयूर ढोरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा श्री. खांडगे यांनी केली. पक्षातीलच नगराध्यक्षपदाच्या दुसऱ्या इच्छुक उमेदवार सुनीता दत्तात्रेय कुडे यांनाही पाच वर्षांत नगराध्यक्ष पदाची संधी देण्यात येईल, परंतु याबाबतचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसून नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करताना याबाबत माहिती दिली जाईल, असे खांडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वडगाव नगरपंचायतीची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार असून निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी शुक्रवारी ( दि. 14 ) पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सांगितले की, आमदार सुनील शेळके यांची दूरदृष्टी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाठबळ याच्या जोरावर वडगाव शहरात सुमारे शंभर कोटी रुपयांची विकासकामे केली असून, शंभर कोटींची कामे प्रस्तावित आहेत.

वडगाव नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षात कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्यामुळे सतरा प्रभागातील उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे. मात्र, नगराध्यक्ष पदाचा निर्णय एकमताने झाला आहे. पाच वर्षांत अबोली ढोरे व सुनीता कुडे या दोघी जणींना नगराध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय झाला असून त्यांचा कालावधी नंतर निश्चित केला जाईल. पहिली संधी अबोली ढोरे यांना देण्यात येणार असे, सांगताना नगरसेवक पदाची यादीही लवकरच जाहीर होईल, अशी माहिती गणेश खांडगे यांनी दिली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Accident


dainik maval jahirat

Previous Post

आमणे–लोनाड पालखी सोहळ्यात उसळली भक्तीची लाट ; मेघाताई भागवत यांना मिळाला वारकऱ्यांचा प्रेमळ आशीर्वाद

Next Post

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 : शुक्रवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat General Election 2025 No nomination papers filed till Friday

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 : शुक्रवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.