व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही - राज्य निवडणूक आयोग

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 15, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
Maharashtra State Election Commission

File Image


Dainik Maval News : नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतीही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेऊन व त्यावर स्वाक्षरी करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे.

परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत (Print Out) काढून त्यावर उमेदवाराची स्वत:ची व सूचकांची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या मूळ प्रतीसह अन्य आवश्यक कागदपत्रांचा (उदा. नगरपरिषद/ नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयं घोषणापत्र, निवडणुकीसाठी बॅंक खात्याचा तपशील, राखीव जागांवरील उमेदवार असल्यास जात प्रमाणपत्र, पक्षाचा उमेदवार असल्यास ‘जोडपत्र- 1’ किंवा ‘जोडपत्र- 2’ इत्यादी) संपूर्ण संच विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे बंधनकारक आहे.

इच्छुक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासून सुरू केलेले संकेतस्थळ 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 24 तास सुरू असेल. तोपर्यंत त्यावर इच्छुक उमेदवारांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येते व नोंदणी करताना तयार केलेला लॉगीन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो. कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असते. सही केलेल्या प्रिंटआऊटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

सर्व कागदपत्रांसह नामनिर्देशनपत्र शनिवारी, 15 नोव्हेंबर 2025 या सुटीच्या दिवशीसुद्धा स्वीकारण्यात यावेत, अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, रविवारी (ता. 16) ते स्वीकारण्यात येणार नाहीत. इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना देण्यात आले आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Accident


Previous Post

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 : शुक्रवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही । Vadgaon Maval

Next Post

तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shri Kshetra Alandi Pune

तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू - वाचा अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांनी संयुक्तरित्या लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.