व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत निवडणूक : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज होणार मृणाल म्हाळसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

श्री पोटोबा महाराज मंदिरात नारळ फोडून रवींद्र चव्हाण करणार नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मृणाल म्हाळसकर आणि भाजपाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा आरंभ

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 22, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Vadgaon Nagar Panchayat Election Mrunal Mhalaskar campaign will be launched in presence of BJP Ravindra Chavan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या मृणाल म्हाळसकर आणि उर्वरित सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी ( दि. २२ नोव्हेंबर) होणार आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वडगाव नगरीचे ग्रामदैवत तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार अॅड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर आणि सतरा वॉर्डातील पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार ( यात युतीचे काही उमेदवार) यांच्याही प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती मृणाल म्हाळसकर यांनी दिली आहे.

वडगाव शहरात भारतीय जनता पार्टी पक्षाची मोठी ताकद आहे. पूर्वीपासून वडगाव शहर हे संघाचे केंद्र राहिले असून भाजपाचा बालेकिल्ला राहिलेले आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव शहराच्या वडगाव नगरपंचायतीवर पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी भारतीय जनता पार्टी पक्षाने कंबर कसली असून पक्षाने सर्व जागांवर तगडे उमेदवार उभे केले आहेत.

या सोबतच नगराध्यक्षपदासाठी मृणाल म्हाळसकर यांच्यासारखी सुशिक्षित आणि नागरी समस्यांची जाण असणारी आणि समस्या सोडविण्याचे योग्य धोरण असणारी महिला उमेदवार दिली आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला असून स्वतः प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याने मोठा उत्साह आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade


Previous Post

तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade

Next Post

घराणेशाही आवडे सर्वांना ! संधीची समानता हरवली ; लोकशाहीच्या तत्वांना राजकीय पक्षांकडून सोईस्कर बगल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Everyone loves nepotism Equality of opportunity lost Political parties conveniently sidestep principles of democracy

घराणेशाही आवडे सर्वांना ! संधीची समानता हरवली ; लोकशाहीच्या तत्वांना राजकीय पक्षांकडून सोईस्कर बगल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.