व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : वॉर्ड क्रमांक 10 मध्ये आकांक्षा वाघवले यांचा जोरदार प्रचार । Vadgaon Maval

आमदार सुनील शेळके यांनी रविवारी ( दि. 23 ) प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर सोमवारी आकांक्षा वाघवले यांच्याकडूनही प्रभागामध्ये प्रचार सुरू करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 25, 2025
in मावळकट्टा, लोकल, शहर
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Akanksha Waghvale campaigning vigorously in Ward No 10

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये वार्ड क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या नगरसेवक पदासाठीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या आकांक्षा बंटी उर्फ योगेश वाघवले यांच्याकडून सोमवारी (दि. 24) प्रभागामध्ये जोरदार प्रचार करण्यात आला. त्यांच्या प्रचार रॅलीत महिला भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

आमदार सुनील शेळके यांनी रविवारी ( दि. 23 ) प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर सोमवारी आकांक्षा वाघवले यांच्याकडूनही प्रभागामध्ये प्रचार सुरू करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे याही उपस्थित होत्या. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवार एकाच वेळी प्रभागामध्ये आल्यामुळे नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

वॉर्डातील नागरिकांच्या घरोघरी जात त्यांच्या भेटीगाठी घेत उमेदवारांकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच प्रभागाबद्दलचे असलेले विकासाचे स्वप्न त्यांच्यापुढे मांडण्यात आले. त्यामुळे एक विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला. वडगाव नगरपंचायतीचा वार्ड क्रमांक 10 हा बाजारपेठ व गाव अशा भागामध्ये असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. त्यामुळे प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न आकांक्षा वाघवले करीत आहेत.

यावेळी प्रत्येक घरामध्ये नागरिकांकडून उमेदवारांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महिला भगिनींकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी प्रभागात असणाऱ्या लहान मोठ्या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठीचे व्हिजन आकांक्षा वाघवले यांनी नागरिकांसमोर मांडले. त्यासोबत अबोली ढोरे यांनी देखील प्रभागाचा विकास नियोजनबद्धरित्या करण्यासाठीचा विश्वास व्यक्त केला.

वार्ड क्रमांक 10 मध्ये असणारी कचऱ्याची समस्या, सार्वजनिक शौचालयाची समस्या, वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असून निवडणुकीनंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार असल्याचे, आकांक्षा वाघवले व अबोली ढोरे यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी उपस्थित महिला भगिनींनी वार्ड क्रमांक 10 मधून आकांक्षा वाघवले आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विक्रमी मतांनी निवडून येतील, असा विश्वास दैनिक मावळ सोबत बोलताना व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अनेक मान्यवर, युवा सहकारी, महिला भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : वॉर्ड क्रमांक 11 मध्ये सुनील ढोरे यांच्याकडून जोरदार प्रचार । Vadgaon Maval

Next Post

कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटात आशाताई वायकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा ! नागरिकांचाही सकारात्मक पाठींबा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Strong discussion on Ashatai Waikar candidacy in Karla Khadkala Zilla Parishad group Maval

कार्ला - खडकाळा जिल्हा परिषद गटात आशाताई वायकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा ! नागरिकांचाही सकारात्मक पाठींबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.