Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटात सध्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या इच्छुक अन् प्रभावी उमेदवार असलेल्या आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांचा गावभेट दौरा सुरू आहे. नुकतीच अशाताई वायकर यांनी शिलाटणे गावात भेट देत ग्रामदैवताचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला. याप्रसंगी शिलाटणे ग्रामस्थांनी सौ. वायकर यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले.
शनिवारी (दि. २९ नोव्हेंबर) रोजी आशाताई वायकर यांनी शिलाटणे गावभेट दौरा पूर्ण केला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी पक्षाचे अनेक मान्यवर, शिलाटणे गावचे आजी-माजी सरपंच, ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी सौ. वायकर यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. आशाताई वायकर यांनी श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले, तसेच बुद्ध विहारास भेट देत वंदन केले. त्यानंतर उपस्थित सर्व ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.
सौ. वायकर यांनी ग्रामस्थां सोबत आपुलकीने संवाद साधला, यावेळी ग्रामस्थांनीही मनमोकळेपणाने त्यांच्या अडीअडचणी सौ. वायकर यांच्यापुढे मांडल्या. येत्या काळात नियोजनबद्धरित्या या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचे ठोस आश्वासन सौ. वायकर यांनी शिलाटणे ग्रामस्थांना दिले. तर, ग्रामस्थांनीही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आशाताई वायकर यांना आपला सकारात्मक पाठींबा दर्शविला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
– मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद
– Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…

