Dainik Maval News : टी. बालवडकर कनिष्ठ महाविद्यालय, बालेवाडी, पुणे येथे शनिवारी (दि. ६) शिक्षक व अधिकारी, कर्मचारी यांच्या पुणे विभागस्तरीय खो-खो स्पर्धा झाल्या. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघाने अहिल्यानगर व सोलापूर जिल्हा संघाचा पराभव करत पुणे संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. यावेळी विभागिय क्रिडा प्रमुख म्हणून अधिव्याख्याते विकास गरड हे होते, तर स्पर्धा आयोजन व नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नामदेव शेंडकर यांनी काम पाहिले. विजेता संघ हा कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी सर्जेराव सुरेश पाखरे, श्रीमती मीना अशोक म्हसे, राजेंद्र बाबुराव मानाळे, परमेश्वर भारत जाधव, आण्णासो मारुती भोंग, मुजावर शहेनशाह इब्राहिम, आशा राजाराम सकट, कल्याण मारुती पिंगळे, संदीप निवृत्ती चव्हाण, गौळण तुकाराम राठोड, अक्षदा संपत आगळे, जयश्री किसन इष्टे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात घेतल्यामुळे सर्वच खेळाडूंने समाधान व्यक्त केले.
सर्व संघात चुरशीच्या लढती :
चुरशीच्या लढतीत पुणे संघातील मुजावर हे राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी अहिल्यानगर विरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद ६ मिनिटे सर्वोत्कृष्ट पळतीचा खेळ करून संघास विजय मिळवून दिला. तर सोलापूर विरुध्दच्या सामन्यात परमेश्वर जाधव व संदीप चव्हाण यांनी उत्कृष्ट खेळ करून संघाला विजय मिळवून दिला. महिला खेळाडूंनी पुरुषांबरोबर जिवाची बाजी लावत विजयात सिंहाचा वाटा उचलला. प्रत्येकी सहा पुरुष व महिला खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघांमधील सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या संघास राष्ट्रीय खो-खो खेळाडू व विस्तार अधिकारी प्रणिता कुमावत यांनी मार्गदर्शन केले.
सर्व विजयी संघातील खेळाडूंचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, विस्तार अधिकारी मुकुंद देंडगे, किसन खोडदे, रघुनाथ पवार, श्रीकांत निश्चित, विषय तज्ञ संदीप क्षिरसागर, संतोष गावडे, सारिका चव्हाण, करंदी केंद्राचे केंद्रप्रमुख नथू ढेरे, शिक्षक नेते उत्तम भंडारे, तनिष्का प्रेरणा प्रतिष्ठाण अध्यक्षा अन्नपूर्णा पाखरे, शिक्षका मंगल वाजे सुरेखा दसगुडे, नयना अरगडे, वैशाली थिटे, शिक्षक गणेश नप्ते, अवदुंबर प-हाड, राजाराम सकट, प्रदीप ढोकले, गणेश जगताप, अनिल फुंदे, विनायक वाळके, अनिल कटके, दत्तात्रय गायकवाड, मंगेश काळे, संतोष गायकवाड, सोपान नप्ते, हिरामण ढोकले, बाबासाहेब गावडे,विकास गायकवाड, नवनाथ वडघुले, सागर करपे, चंद्रशेखर अनारे, श्रीकांत सुंकरवार आदींनी केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले
