व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे ते उरूळी कांचन बाह्यवळण रेल्वे मार्गासाठी फेरसर्वेक्षण आणि रेल्वे मार्गात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी

तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग पुणे शहराच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पुणे-अहिल्यानगर नवीन मार्गाचा भाग म्हणून आणला जात आहे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 14, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Talegaon Dabhade to Uruli Kanchan railway line Locals oppose proposed railway line Project

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : “तळेगाव दाभाडे-उरूळी कांचन या प्रस्तावित बाह्यवळण रेल्वे मार्गासाठी स्थानिक शेतकऱ्यांची वापरात असलेली जमीन मोठ्या प्रमाणात संपादित केली जाणार आहे. त्यामुळे या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पास शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून हा विरोध रेल्वेला नाही तर मार्गात बदल व्हावा यासाठी असून त्याकरिता फेरसर्वेक्षण करण्याची त्यांची मागणी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करुन प्रस्तावित रेल्वे मार्गाचा फेर सर्व्हे करावा,” अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभा अधिवेशनात केली.

तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग पुणे शहराच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पुणे-अहिल्यानगर नवीन मार्गाचा भाग म्हणून आणला जात आहे. मात्र या मार्गामुळे बाधित होणाऱ्या गावातील शेतकरी आणि स्थानिकांकडून याला तीव्र विरोध होत आहे. याच विरोधामुळे मार्गाच्या आखणीन बदल करण्याची मागणी केली जात आहे. हा प्रश्न खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे ते उरूळी कांचन हा नवीन बाह्यवळण रेल्वे मार्ग तयार केला जात आहे. या मार्गाचे सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाबाबतचे नोटीफिकेश प्रसिद्ध केले आहे. मावळ, खेड, हवेली तहसील कार्यालय हद्दीतील गावांमधून हा मार्ग जाणार आहे. देहूगाव नगरपंचायत हद्दीतील विठ्ठलनगर, माळीनगर, झेंडेमळा, बोडकेवाडी, हगवणे, काळोखे मळा, सांगुर्डे, इंदोरी पुढे धानोरे, सोळू, मोई, चिंबळीमधून हा मार्ग जाणार आहे.

दरम्यान या गावांमधील शेकडो हेक्टर जमीन संरक्षण विभाग, रेल्वे लाईन, गॅस पाईपलाईन, रिंगरोड प्रकल्प, एमआयडीसी, पुणे-राष्ट्रीय महामार्ग याकरिता यापूर्वी संपादित केली आहे. आता प्रस्तावित तळेगाव दाभाडे ते उरूळी कांचन रेल्वे मार्गासाठी देखील जमीन भूसंपादन करावे लागणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा रेल्वे मार्गाला विरोध नाही. परंतु याचा दुसऱ्यांदा सर्व्हे करावा. रेल्वे मार्गात बदल करावा. त्यात शाळा, घरे, शेतीक्षेत्र प्रभावित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचा भावनांचा विचार करुन आवश्यक बदल करावा. प्रस्तावित रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही. शेतकऱ्यांचे नुकसान न करता बाजूने सर्व्हे करावा, असे खासदार बारणे म्हणाले.

का होतोय विरोध?
देहू परिसरातील शेतजमिनींचे यापूर्वीच विविध प्रकल्पांसाठी संपादन केले गेले आहे. गॅस कंपनीच्या भूमिगत पाइपलाइनसाठी जमिनी संपादित केल्या आहेत, तर पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल लाइनसाठी शेतजमिनी संपादित केल्या आहेत. याबरोबर संरक्षण खात्याने सन २०१३ मध्ये रेडझोन हद्द निश्चित केली आहे. देहू विकास आराखड्यांतर्गत जुना पालखी मार्ग आणि देहू ते देहूरोड मार्गासाठीही जमिनींचे भू-संपादन प्रस्तावित आहे. त्यामुळे स्थानिक, शेतकऱ्यांकडून या प्रस्तावित रेल्वे मार्गाला विरोध केला जात आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले


dainik maval jahirat

Previous Post

विभागस्तरीय खो-खो स्पर्धेत अहिल्यानगर व सोलापूर संघाचा पराभव करीत पुणे जिल्हा संघाची राज्यस्तरीय स्पर्धेत दणक्यात एन्ट्री

Next Post

Umed Mall In Maharashtra : महिला बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात ‘उमेद मॉल’ उभारले जाणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Umed Mall In Maharashtra

Umed Mall In Maharashtra : महिला बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात 'उमेद मॉल' उभारले जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.