Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी २ तलाठी, ४ मंडल अधिकारी आणि ४ तहसीलदार अशा एकूण १० महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशवात स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबनाची माहिती दिली. महसूल मंत्र्यांच्या या कारवाईचा मावळ तालुक्यातील महसूल विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी निषेध नोंदविला आहे. ( Illegal mining case in Mangrul maval Revenue Employees Association protests suspension of Tehsildar Mandal Officer Talathi )
महसूल कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांनी याबद्दलचे बॅनर तहसील आवारात लावले आहेत. त्यावर, “महसूल मंत्री महोदय यांनी विधानसभा हिवाळी अधिवेशनामध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांना कोणतेही चौकशी न करता निलंबित केले आहे. या कारवाईचा महसूल कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, तालुका मावळ, जिल्हा पुणे व समस्त अधिकारी, कर्मचारी तहसील कार्यालय मावळ यांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.” असा मजकूर आहे.
मावळचे विद्यमान तहसीलदार यांच्यासह अनेकांचे निलंबन
महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिवेशनात सांगितले की, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे उत्खननाची परवानगी 3 लाख 63 हजार ब्रास इतकी असतानाही 4 लाख 54 हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले. यासंदर्भात, विभागीय आयुक्तांमार्फत नव्याने चौकशी केली असता, तपासात उत्खननाचे प्रमाण परवानगीपेक्षा अत्यंत जास्त असल्याचे आणि स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार न पाडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अवैध उत्खनन होत असताना जबाबदारी न निभावणाऱ्या संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदारावर तत्काळ निलंबन कारवाई जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर, यासंदर्भात विभागीय आयुक्त यांनी दिलेला पहिल्या अहवालाची तपासणी मुख्य सचिवांमार्फत करण्यात येईल. या निलंबन केलेल्या अधिकाऱ्यांवर तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण केली जाणार असून चौकशी अहवाल पुढील अधिवेशनात पटलावर ठेवण्यात येईल, असे सांगितले होते.
दरम्यान, वरीष्ठ महसूल अधिकारी यांच्या अशा तडकाफडकी निलंबनाचा मावळातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी संघटनेमार्फत निषेध नोंदविला आहे.
निलंबनाची कारवाई झालेले अधिकारी – यादी
तलाठी : दिपाली सनगर, गजानन सोटपल्लीवार
मंडल अधिकारी : संदीप बोरकर, अजय सोनवणे, माणिक साबळे, रमेश कदम
तहसीलदार : जोगेंद्र कटियार, रणजीत देसाई, मधुसूदन बर्गे, विक्रम देशमुख
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले
