Dainik Maval News : मावळ तालुक्यातून जाणाऱ्या जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरील टोल प्लाझा असलेल्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि जागोजागी ब्लॅक स्पॉट ठिकाणी वारंवार होणारे अपघात, या प्रश्नांबद्दल आमदार सुनील शेळके यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, वारंवार पाठपुरावा करून देखील एमएसआरडीसी प्रशासन आणि आयआरबी प्रशासन यावर योग्य त्या उपाययोजना करीत नसल्याने येत्या दहा दिवसांत टोलप्लाझा ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत आणि ब्लॅकस्पॉट ठिकाणी अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना न केल्यास दहा दिवसांनंतर दोन्ही टोलनाके बंद पाडणार, असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.
बुधवारी ( दि. १७ ) पंचायत समिती कार्यालय मावळ याठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीनंतर आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी माध्यम प्रतिनिधींनी जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर ठराविक ठिकाणी वारंवार होणारे अपघात आणि टोलनाका असलेल्या ठिकाणी होणारी वाहतुक कोंडी याबाबत प्रश्न उपस्थित केले.
त्यावर उत्तर देताना आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ब्लॅकस्पॉट ठिकाणी उपाययोजना करणे आणि टोलनाका असलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. परंतु वास्तवात अपेक्षित काम संबंधित यंत्रणेंकडून होताना दिसत नाही, त्यामुळे येत्या दहा दिवसांत याबद्दल ठोस असा निर्णय न घेतल्यास सोमाटणे फाटा आणि वरसोली हे दोन्ही टोलनाके बंद पाडणार.’ असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले

