Dainik Maval News : मावळ तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक खुलासे घेण्यात आले आहेत. हे खुलासे व विभागीय आयुक्तांचा स्वतंत्र अहवाल राज्य सरकारला शुक्रवारी पाठविण्यात आला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन तीन दिवसांत मागे घेऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या निलंबनाबाबत मंगळवारी (दि. २३) निर्णय होईल, अशी अपेक्षा राज्य अधिकारी व कर्मचारी महासंघाला आहे.
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात १२ डिसेंबर रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचना करण्यात आली होती. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी या गौण खनिज प्रकरणात चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी व दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा केली.
सदर कारवाई विरोधात पुणे विभागातील सर्व महसूल कर्मचारी आक्रमक झाले होते. राज्य सरकारने या सर्व १० अधिकारी व कर्मचाऱ्यांना खुलासे देण्याचे सांगितले. त्यानुसार या सर्वांनी खुलासे दिले असून, त्यात आपण निर्दोष असल्याचे स्पष्ट केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

