Dainik Maval News : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अॅड. कैलास पानसरे यांनी त्यांच्या प्रशासक पदाचा राजीनामा दिला आहे. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आशिष कटोच यांच्याकडे अॅड. पानसरे यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
दरम्यान प्रशासक पदाचा कार्यकाळ संपण्याच्या पूर्वीच पानसरे यांनी राजीनामा दिल्याने याबद्दल उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तसेच, कैलास पानसरे यांनी यापूर्वीच भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही राजीनामा सोपविला होता, अशी माहिती समोर येत आहे.
अॅड. कैलास पानसरे यांची ऑक्टोबर २०२० मध्ये देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डावर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून ते प्रशासक म्हणून बोर्डाचा कारभार पाहत होते. त्यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत होता.
आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना पानसरे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून मी या पदावर कार्यरत असून आता इतर कार्यकर्त्यांनाही कामाची संधी मिळावी, या उद्देशाने मी हा निर्णय घेतला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश

