व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“मी मागणी केलेली नाही.. आज ना उद्या अजितदादा मला नक्की मंत्रिपदाची संधी देतील” ; आमदार सुनील शेळके स्पष्टच बोलले

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा विजयी मेळावा झाला, यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांना मंत्रिपद मिळावे असा एकमुखी ठराव मंजूर केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 24, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, व्हिडिओ, शहर
Ajit-Pawar-Sunil-Shelke

Photo - Dainik Maval Graphics Team


Dainik Maval News : राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. अनेक मातब्बर नेत्यांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात केली असून या रेसमध्ये मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचे नाव देखील चर्चेत आहेत.

दरम्यान मंत्रिपदाची चर्चा होत असताना आमदार सुनील शेळके यांनी देखील यामुद्द्यावर भाष्य केले आहे. एका माध्यमांस दिलेल्या मुलाखतीत आमदार सुनील शेळके यांनी यांनी भविष्यात मंत्रीपदाची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. “२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही मी मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पूर्णतः तयार होतो,” असे सूचक वक्तव्य देखील शेळके यांनी यात केले.

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा विजयी मेळावा झाला, यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांना मंत्रिपद मिळावे असा एकमुखी ठराव मंजूर केला. यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी मी कधीही पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी किंवा अजितदादा यांच्याकडे मंत्रिपदाची मागणी केली नसल्याचे सांगितले. परंतु कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यामुळे ते मागणी करतात. तसेच, “अजितदादा मला आज ना उद्या नक्की मंत्रीपदाची संधी देतील,” असेही आमदार शेळके यांनी स्पष्टपणे सांगितले.

राज्याचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरवले आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देत मोठा दिलासा दिला असून त्यांची आमदारकी वाचली आहे. परंतु कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या विभागांचा पदभार सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषद : नवीन पालिकेत 21 नवोदीत नगरसेवकांची निवड ; शेळके आडनावाचे तीन, भेगडे आडनावाचे पाच नगरसेवक

Next Post

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक, भाजपा नेते कैलास पानसरे यांचा अचानक राजीनामा ; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Cantonment Board Dehu Road

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक, भाजपा नेते कैलास पानसरे यांचा अचानक राजीनामा ; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.