व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने देशातील वीस मुलांचा सन्मान ; महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा समावेश

वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशातील 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने(2025) सन्मानित करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 26, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र
PM National Children Award honors twenty children Maharashtra Arnav Maharshi included

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशातील 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने(2025) सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी छत्रपती संभाजी नगर येथील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले. महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील 20 बालकांना २०२५ या वर्षासाठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले.

शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या बालकांना गौरविण्यात आले. यापैकी दोघांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारार्थीमध्ये मध्ये ९ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा गौरव
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षीय अर्णव महर्षी यास विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांसाठी AI-आधारित पुनर्वास उपकरण आणि अॅक्टिव्ह हँड रिस्ट बँड तयार करणाऱ्या अर्णव महर्षी याने स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने हे नवोन्मेषी उपकरण विकसित केले आहे. या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.

पुरस्कृत बालक भारताच्या अमृत पिढीचे प्रतिनिधी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून ही बालके भारताच्या अमृत पिढीचे खरे प्रतिनिधी आहेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि इतर आव्हानांवर मात करून शौर्य, कला-संस्कृती, पर्यावरण, नवाचार, विज्ञान, समाजसेवा व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. हा पुरस्कार युवा पिढीतील शौर्य, धैर्य आणि संवेदनशीलतेला प्रोत्साहन देणारा ठरेल, असे त्यांनी सांगितले. या मुलांच्या संकल्प आणि प्रयत्नांमुळे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असा विश्वास राष्ट्रपती यांनी यावेळी व्यक्त केला.

इतर पुरस्कार विजेत्यांची नावे
व्योमा प्रिया – शौर्य – तमिळनाडू (मरणोत्तर)
कमलेश कुमार – शौर्य – बिहार (मरणोपरांत)
मोहम्मद सिडान पी – शौर्य – केरळ
अजय राज – शौर्य – उत्तर प्रदेश
एस्थर लालदुहोमि – कला संस्कृती – मिझोरम
सुमन सरकार – कला संस्कृती – पश्चिम बंगाल
पूजा – पर्यावरण – उत्तर प्रदेश
शवन सिंह – सामाजिक सेवा – पंजाब
वंश तायल – सामाजिक सेवा – चंदीगड
आइशी प्रिशा – विज्ञान तंत्रज्ञान – आसाम
अर्णव महर्षि – विज्ञान तंत्रज्ञान – महाराष्ट्र
शिवानी उपारा – क्रीडा – आंध्र प्रदेश
वैभव सूर्यवंशी – क्रीडा – बिहार
योगिता मंडावी – क्रीडा – छत्तीसगड
लक्ष्मी प्रगयिका – क्रीडा – गुजरात
ज्योति – क्रीडा – हरियाणा
अनुष्का कुमारी – क्रीडा – झारखंड
धिनिधि देसिंगु – क्रीडा – कर्नाटक
ज्योषणा सबर – क्रीडा – ओडिशा
विश्वनाथ कार्तिके – क्रीडा – तेलंगणा


Previous Post

स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 तर्फे तळेगाव दाभाडे शहरातील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

Next Post

Bhausaheb Gund : भाऊसाहेब गुंड यांच्या माध्यमातून मोरवे गावात आज महिला-भगिनींसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Khel Rangala Paithanicha program organized in Morve village Maval through BJP Bhausaheb Gund

Bhausaheb Gund : भाऊसाहेब गुंड यांच्या माध्यमातून मोरवे गावात आज महिला-भगिनींसाठी 'खेळ रंगला पैठणीचा' कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.