Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि दत्ताभाऊ गुंड युवा मंच मावळ आयोजित खेळ रंगला पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम पवन मावळतील मोरवे गावात आयोजित करण्यात येत आहे. आज शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होणार असून अँकर प्रसाद कालेकर हे निवेदक म्हणून उपस्थित असणार आहेत.
खास महिला भगिनींसाठी मोरवे गावातील महिला भगिनींसाठी आयोजित या कार्यक्रमात बक्षिसांचा पाऊस पडणार आहे. प्रथम क्रमांकाच्या बक्षीसासाठी वॉशिंग मशीन, द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसासाठी शिलाई, मशीन तृतीय क्रमांक साठी मोबाईल, फोन चतुर्थ क्रमांकासाठी कुलर आणि पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यासाठी मिक्सर अशी बक्षीसे आणि सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक पैठणी भेट म्हणून देण्यात येणार आहे.
मोरवे गावातील सर्वच महिला भगिनींनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आव्हान दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमानंतर सर्वांसाठी भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.
काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रबळ इच्छुक उमेदवार असलेले दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या गावभेट संवाद दौऱ्यानंतर महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाला देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून भाऊसाहेब गुंड यांच्या जनसंपर्काची नाळ अधिक घट्ट होत असून त्यांच्या नेतृत्वाला सर्व स्तरातील नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी

