Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कार्ला – खडकाळा या जिल्हा परिषद गटात निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वात प्रभावी आणि सक्षम उमेदवार असलेल्या आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांचा सध्या गावभेट दौरा सुरू आहे. त्यांच्या गावभेट दौऱ्याला प्रत्येक गावातील नागरिकांचा खास करून महिलाभगिनींचा मोठा पाठींबा मिळताना दिसत असून कुसगाव खुर्द येथे गावभेट दौऱ्यात आशाताई वायकर यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले.
कुसगांव खुर्द गावभेट दौऱ्यात आशाताई वायकर यांच्या समवेत भाजपाचे ज्येष्ठ नेते, तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुरावआप्पा वायकर, पक्षातील अन्य पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामदैवताचे दर्शन घेऊन सुरूवात झालेल्या या गाव भेट दौऱ्यात महिला भगिनींना इच्छुक उमेदवार असलेल्या आशाताई वायकर यांचे उत्साहात स्वागत केले.
याप्रसंगी सौ. वायकर यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न समजावून घेतले. तसेच, येत्या काळात हे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांनी देखील विकासाची दुरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून आशाताई वायकर यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार बोलवून दाखविला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी

