Dainik Maval News : मावळ तालुक्यातील उर्से गावात चिमुकलीवरील अत्याचार आणि खुनाच्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेला सतरा दिवस उलटूनही आरोपीला शिक्षा न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपीला लवकर शिक्षा मिळावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. २९) मावळ बंद ठेवण्याचा निर्णय अखंड मराठा समाजाने घेतला आहे. तालुक्यातील सर्व मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करून तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून उर्से ग्रामस्थ, अखंड मराठा समाज, सर्व पक्ष व विविध संघटनांच्यावतीने हा बंद पाळण्यात येणार आहे.
याबाबत उर्सेमधील पद्मावती मंदिरात ग्रामसभा घेण्यात आली. या सभेला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या घटनेचा निषेध करण्यासाठी तळेगाव व उर्से खिंडीतील ज्योतिर्लिंग चौकात जमा होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी

