Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष परदेशी (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे) हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रांगोळी दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे हे होते. कार्यक्रमासाठी आशा सोहनी याही उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ‘विश्वविजेता’ या हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले. तसेच त्यांच्यामार्फत जाहीर केलेल्या इयत्ता बारावी कला शाखेतून प्रथम आलेल्या कु. रागिनी नाईक या विद्यार्थिनीला स्कॉलरशिपचा धनादेश त्यांनी सुपूर्द केला.
कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, मुख्याध्यापक संतोष खामकर, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माधुरी चंदनशिव, बाळासाहेब जाधव, माजी विद्यार्थी कु. सोनाली जाधव व प्रतीक पानसरे आदी तसेच कला विज्ञान व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु. सोनाली जाधव जिने नुकतीच सी.ए. परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. तसेच माजी विद्यार्थी चि. प्रतीक पानसरे याने देखील सी.एम.ए. ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्याबद्दल कॉलेजकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. दोघांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सहसचिव प्रा. वसंत पवार यांनी प्रास्ताविक केले. प्र. प्राचार्य संजय देवकर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.
प्रमुख अतिथी संतोष परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आपले आई, वडील, गुरु यांचा आदर करावा असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये यादवेंद्र खळदे यांनी परिश्रम, जिद्द, चिकाटी ही त्रिसूत्री विद्यार्थ्यांनी वापरून यश संपादन करावे, असे सांगून एआय सारखे नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता हिचा चांगल्या कामासाठी वापर करा, चुकीच्या कामासाठी वापर केला तर ते घातक आहे, हेही आवर्जून सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी केले. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत गुंड व प्रा. पुष्पलता धुमाळ यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणिता गजभिव आणि प्रा. वैशाली गवारी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. पल्लवी वंजारे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व पालक यांचे उत्तम सहकार्य लाभले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
– कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट

