व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शौर्य दिनी नवा विक्रम : 25 लाख अनुयायांच्या उपस्थितीत विजयस्तंभ अभिवादन सोहळा संपन्न

भीमा - कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेमध्ये सुमारे 25 लाख अनुयायांच्या उपस्थितीत पार पडला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 2, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
New record on Shourya Day Koregaon Bhima Vijaya Stambh salute ceremony held

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भीमा – कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेमध्ये सुमारे 25 लाख अनुयायांच्या उपस्थितीत पार पडला आहे. यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणारे जिल्हा प्रशासन व भिमनअनुयायी यांचे भीमा कोरेगाव विजयस्तंभ शहर दिन समन्वय समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.

1818 च्या कोरेगाव भीमा लढ्यामध्ये शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ पेरणे येथे उभारण्यात आलेल्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लक्षावधी आंबेडकरी अनुयायी दरवर्षी येत असतात. यावर्षी महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागातून आलेल्या तब्बल 25 लाख अनुयायांनी अभिवादन करून आपल्या पूर्वजां प्रतिकृतीचा व्यक्त केली केली. सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन सोहळ्यास सुरुवात केली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे , भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर , शिवसेना उपनेते सुषमा अंधारे , आमदार बापू पठारे , आमदार माऊली कटके , आमदार प्रकाश गजभिये , अनुसूचित जाती आयोगाचीॲड. गोरक्षनाथ लोखंडे , भारतीय दलित कोब्राचे ॲड. भाई विवेक चव्हाण , रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे , रणस्तंभ सेवा समितीचे सर्जेराव वाघमारे ॲ विवेक बनसोडे , युवराज बनसोडे यांचे सह विविध पक्ष संघटनातील मान्यवरांनी अभिवादन केले.

महार सैनिकांची मानवंदना
महार रेजिमेंट मधून निवृत्त झालेल्या यशसिद्धी आजी-माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून सुमारे 3000 निवृत्त महार सैनिकांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे प्रमुख उपस्थितीत विजयस्तंभाला सकाळी नऊ वाजता मानवंदना दिली. यावेळी पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा व पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांचे सह बार्टी महासंचालक सुनील वारे , शौर्यदिन समन्वय समितीचे राहुल डंबाळे यांचेसह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्तांनी अनुयायांना शौर्य दिनाच्या शुभेच्छा देत हा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडत असल्याबद्दल आभार व्यक्त केले.

सुविधांमुळे नागरिकांमध्ये समाधान
विजयस्तंभ परिसरामध्ये बार्टी , जिल्हा परिषदेलह विविध विभागांनी उभारलेल्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण जाणवत होते, विशेषता जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरोग्य कक्ष व हिरकणी कक्षाचा लाभ घेणाऱ्या महिला व नागरिकांनी या ठिकाणी देण्यात आलेल्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले.

सभांद्वारे अभिवादन
रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांची दुपारी १२ वा. सभा पार पडली तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या स्टेजवरून भीमराव आंबेडकर यांची देखील दुपारी दिड वाजता सभा झाली. शौर्यदिन समन्वय समितीच्या वतिनी घेण्यात आलेल्या सभेत विजयस्तंभ स्मारकाचे काम त्वरीत सुरू करावे अशी आग्रही मागणी या ठिकाणी झालेल्या सभेतून राहुल डंबाळे व सुवर्णा डंबाळे यांनी केली.

विजयस्तंभ परिसरात भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने नागरिकांसाठी आराम कक्ष उभारण्यात आला होता, याचा सुमारे दोन हजार नागरिकांनी लाभ घेतला तसेच याच सभामंडपात महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलसा व भीमा कोरेगाव वरील पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिला. या ठिकाणी गायक अमर पुणेकर यांनी भीमा कोरेगाव वरील भीमगीते गायन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली होती त्यांच्या समवेत ज्येष्ठ गायक आनंद शिंदे समर्थक शिंदे या शिंदे शाही कुटुंबीयांनी गाणी गायली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
– कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्र ही सांताची नव्हे तर संतांची भूमी – हभप कबीर महाराज अत्तार ; मावळात राज्यातील सर्वात मोठ्या कीर्तन महोत्सवाची सुरूवात

Next Post

तळेगाव दाभाडेमधील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Annual get-together prize distribution ceremony at Adarsh ​​Junior College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेमधील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.