Dainik Maval News : पर्यटननगरी लोणावळा शहरात दुचाकीच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या आणि फटाके फोडत नागरिकांना त्रास देणाऱ्या दुचाकीस्वारांवर लोणावळा शहर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत झालेल्या धडक कारवाईत पंधराहून अधिक बुलेटसह एकूण ३४ दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ५५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मागील अनेक दिवसांपासून लोणावळा शहर आणि परिसरात ग्रामीण भागात मॉडिफाईड सायलेन्सर बसवलेल्या दुचाकींचा सुळसुळाट झाला होता. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी आणि शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर तरुण मुले सायलेन्सरमधून फटाक्यांसारखे आवाज काढून ध्वनी प्रदूषण करत होती. या त्रासाबाबत ॲड. माधवराव भोंडे यांनी पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अनिल शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. पोलिसांनी केवळ दंड आकारून या दुचाकीस्वारांना सोडले नाही, तर नियमांचे उल्लंघन करणारे सायलेन्सर देखील काढून घेतले आहेत. शहरात शांतता राखण्यासाठी आणि पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो

