Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेच्या कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या युतीच्या अधिकृत उमेदवार व पीएमआरडीएच्या सदस्य दिपाली दीपक हुलावळे तसेच मावळ पंचायत समितीच्या कार्ला गणाच्या उमेदवार रेश्मा राजू देवकर या दोन्ही उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कार्ला, वाकसई, देवघर या पंचक्रोशी मधून मोठे मताधिक्य देत स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचा शब्द गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
कार्ला, शिलाटणे, टाकवे, फांगणे, वेहेरगाव, दहिवली, वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, सदापूर, मळवली, वरसोली, वाकसई चाळ ही सर्व गावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात. मावळ तालुक्यामध्ये पंचवीस वर्ष भाजपाचे सत्ता असताना देखील या पंचक्रोशी मधील गावांनी कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडी दिली आहे.
मागील सहा वर्षांमध्ये आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या माध्यमातून या सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी देत गावातील मूलभूत कामांना गती देण्यात आली आहे. गावातील रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची योजना, अंतर्गत रस्ते, आई एकविरा देवस्थान चा विकास अशा विविध कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील या सर्व भागांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिपाली दीपक हुलावळे व पंचायत समितीच्या उमेदवार रेश्मा राजू देवकर या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य देत ही गावे अजितदादा पवार यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली समर्पित करतील, असा विश्वास या गावातील ग्रामस्थांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या रक्षा कलशाचे दर्शन घेताना व्यक्त केला आहे.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या रक्षा कलाशाचे दर्शन घेताना महिला भगिनींचे डोळे ओले झाले होते. त्यांच्या भावना अनवर झाल्या होत्या व अश्रूंचे बांध सुटले होते. आज अजित दादा पवार जरी आपल्यात नसले तरी दादांच्या रूपाने जनसेवक म्हणून कामाच्या माध्यमातून ज्यांची ओळख आहे, अशा सुनील अण्णा शेळके यांच्या पाठीशी आज सर्व भाग खंबीरपणे उभा आहे. येथील महिला भगिनी ह्या सुनील आण्णा शेळके व त्यांचे शिलेदार म्हणून या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेल्या दिपालीताई हुलावळे व रेश्मा राजू देवकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून अजित दादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडवण्यासाठी आम्ही कायम घड्याळाच्या सोबतच राहू असा विश्वास येथील महिला भगिनींनी व्यक्त केला आहे.
सर्वच गावांमध्ये अजितदादा पवार यांच्या रक्षा कलशाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ विशेषता महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अजित दादा पवार यांची आठवण कायम ग्रामस्थांच्या मनामध्ये राहावी याकरिता प्रत्येक गावाला अजितदादा पवार यांचे छायाचित्र भेट देण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो
