Dainik Maval News : महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके यांचे शिलेदार म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित असलेल्या कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार दिपाली दीपक हुलावळे आणि खडकाळा पंचायत समिती गणाचे उमेदवार समीर जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तसेच कान्हे, आंबेवाडी, नायगाव, येवलेवाडी, चिखलसे, कुसगाव खुर्द या सर्व गावांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना मत हीच अजित दादा पवार यांना आमची खरी श्रद्धांजली असेल, अशी भावना या नागरिकांनी स्व. अजितदादा पवार यांच्या रक्षा कलश यात्रेचे दर्शन घेताना व्यक्त केल्या आहेत.
स्वर्गीय अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी दुखद निधन झाले. त्यांचा रक्षा कलश हा मावळ तालुक्यामध्ये आणण्यात आला असून मागील दोन दिवस कार्ला पंचायत समिती गणामध्ये तो सर्व गावांमध्ये रथामधून फिरवण्यात आला. ज्या नागरिकांना अजितदादा पवार यांच्या अंत्यविधीसाठी जाता आले नाही त्या सर्वांना या रक्षा कलशाच्या माध्यमातून दादांचे अंतिम दर्शन घेता यावे, हा याचा उद्देश आहे.
प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी या रक्षा कलशाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होत्या. रक्षा करण्याचे दर्शन घेत असताना महिलांच्या व नागरिकांच्या भावना अनावर होत होत्या. अनेकांचे अश्रूंचे बांध फुटत होते. बारामतीच्या धर्तीवर मावळ तालुक्याचा विकास करण्याचे स्वप्न अजितदादा पवार यांनी पाहिले होते व ते स्वप्न आम्ही राष्ट्रवादीच्या या दोन्ही उमेदवारांना निवडून देऊन पूर्ण करू हीच अजितदादांना आमची श्रद्धांजली असेल अशा भावना या सर्व गावांमधील नागरिक व्यक्त करत होते.
आर्टिफिशल इंटेलिजन्स याद्वारे अजितदादा पवार यांचा एक संदेश तयार करण्यात आला असून तो या सर्व गावांमध्ये नागरिकांना ऐकवण्यात येत होता. अजित दादा पवार यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आज आमदार सुनील शेळके यांच्यावर आली असून सुनील शेळके यांचे हात मजबूत करण्यासाठी दिपाली दीपक हुलावळे व समीर जाधव या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य देणे हेच आमचे ध्येय असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
मोठ्या संख्येने या सर्व गावांमध्ये नागरिक या रक्षा कलशाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना दिपाली दीपक हुलावळे म्हणाले अजितदादा यांचे आकस्मित निधन ही सर्वच नागरिकांसाठी अतिशय दुःखद व धक्कादायक बाब आहे. मात्र अजित दादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे आता रडायचं नाही तर डोळे पुसून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या हक्कासाठी कामाला लागा हाच दादांचा संदेश घेऊन आम्ही या पुढील काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहू.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो
