Dainik Maval News : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज (दि.5) प्रचाराचा शेवटचा दिवस होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार करत प्रचाराची सांगता केली. मावळ तालुक्यातील काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्याकडून गणरायाचा आशीर्वाद घेत प्रचाराची सांगता करण्यात आली.
काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात दत्तात्रय गुंड यांच्या रूपाने भाजपाने एक अनुभवी उमेदवार दिला आहे. दत्तात्रय गुंड यांनी देखील आपण केलेल्या विकास कामांच्या आणि भविष्यात करणाऱ्या विकास कामांच्या जोरावरती व्हिजनच्या जोरावरती मतदारांपर्यंत पोहोचून मतांचा जोगवा मागितला आहे. त्यांच्या प्रचाराला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतानाचे चित्र दिसून आले होते.
अनेक गावांमध्ये दत्तात्रय गुंड यांच्या उमेदवारीला सकारात्मक पाठिंबा देताना मतदारांनी त्यांना विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला होता. भाऊसाहेब गुंड यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे संतोष राऊत यांचे आव्हान आहे. तर दादा डफळ यांच्या माध्यमातून तिसरं आव्हान देखील आहे. मात्र एकूणच काले कुसगाव बुद्रुक गटामध्ये भाऊसाहेब गुंड यांच्या माध्यमातून तगडे आव्हान समोर असून त्यांचे पारडे जड असल्याचे मतदार सांगत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो