Dainik Maval News : मावळात पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मावळ करिता निवडणुक होत असून शनिवारी (दि.७) मतदान होणार आहे. दरम्यान निवडणूक कार्यक्रमपत्रिकेनुसार गुरुवारी (दि.५) जाहीर प्रचाराची मुदत रात्री दहा वाजता संपली.
आचारसंहितेच्या नियमानुसार जाहीर प्रचार संपल्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रचार करणे बंदी असल्याने गुरुवारी सर्व उमेदवारांकडून प्रचाराची सांगता करण्यात आली. परंतु जाहीर प्रचार संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.
एकीकडे निवडणूक प्रशासनाकडून मतदानाची तयारी सुरु असताना दुसरीकडे उमेदवाराचे कार्यकर्ते देखील बुथ स्तरावरील गाठीभेटी घेऊन मतदानाच्या दिवसाचे नियोजन करण्यात व्यस्त आहेत. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी कार्यकर्ते देखील नियोजन करीत असून छुप्या प्रकारचा प्रचार पाहायला मिळत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी
– लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह
– मावळ तालुक्यात टाकवे बुद्रुक येथे १२ लाख ६० हजारांची कॅश जप्त – निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई