व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीच्या चारही विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

स्थायीसह चारही समित्यांच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची वर्णी लागली ; सदस्य नामनिर्देशित न केल्याने समित्यांमध्ये भाजपचा समावेश नाही

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 6, 2026
in लोकल, शहर
Election for the post of chairman of all four subject committees of Vadgaon Nagar Panchayat unopposed

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीच्या चार विषय समित्यांच्या सभापतींची व समिती सदस्यांची, तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली. स्थायीसह चारही समित्यांच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची वर्णी लागली. नामनिर्देशन पत्र न आल्याने नियोजन व विकास समिती रिक्त राहिली. भाजप सदस्यांनी कोणत्याही समितीच्या सभापती पदासाठी अथवा सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही.

वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांचे सभापती व महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतिपदाच्या निवडीसाठी, तसेच स्थायी समिती स्थापन करण्यासाठी पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीत शुक्रवारी (दि.२३) विशेष सभा झाली.

नगराध्यक्षा अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजय म्हाळसकर, पक्ष प्रतोद माया चव्हाण, भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, पक्ष प्रतोद अनंता कुडे यांच्यासह पूनम भोसले, रोहित धडवले, सुनीता ढोरे, रुपाली ढोरे, विशाल वहिले, अजय भवार, सारिका चव्हाण, आकांक्षा वाघवले, गणेश म्हाळसकर, वैशाली सोनवणे, राणी म्हाळसकर, स्वीकृत सदस्य पंढरीनाथ ढोरे, संदीप म्हाळसकर, कार्यालयीन अधीक्षक मनिषा चव्हाण आदी उपस्थित होते. विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर अनुपस्थित होत्या.

नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ सदस्य व एक अपक्ष असा दहा नगरसेवकांचा एक गट तर भाजपचे सहा व एक अपक्ष असा सात नगरसेवकांचा दुसरा गट स्थापन झालेला आहे. पक्षीय बलाबला नुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला चार समित्यांची सभापतीपदे व प्रत्येक समितीच्या पाच पैकी तीन सदस्यपदे मिळण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार सभापतिपदासाठी सुनील ढोरे, गणेश म्हाळसकर, सुनीता ढोरे, माया चव्हाण तसेच उपसभापतिपदासाठी पूनम भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. प्रत्येक समिती सभापतिपदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची संबंधित समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी डॉ.प्रवीण निकम यांनी केली.

नगराध्यक्षा अबोली ढोरे या स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती असतील, अशी घोषणा करण्यात आली, तसेच विषय समित्यांवर निवड झालेले सभापती मिळून पाच सदस्यांची स्थायी समिती या वेळी स्थापन करण्यात आली. उपनगराध्यक्ष सुनील ढोरे हे पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे पदसिद्ध सभापती असतील, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

दरम्यान, विषय समित्यांपासून तटस्थ राहण्याबाबत भाजपचे गटनेते दिनेश ढोरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,वडगावच्या विकासासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला उपनगराध्यक्षपद बिनविरोध दिले होते. त्याच प्रमाणे पाच पैकी दोन विषय समित्यांची सभापतीपदे देण्याची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे या समित्यांपासून अलिप्त राहण्याचा निर्णय आम्ही घेतला. नगरसेवक म्हणून आम्ही जनसेवेत कार्यरत राहणारच आहोत.

विषय समित्या, त्यांचे नवनिर्वाचित सभापती व सदस्य पुढील प्रमाणे :
स्थायी समिती : अबोली ढोरे (सभापती, पदसिद्ध), सुनील ढोरे, गणेश म्हाळसकर, सुनीता ढोरे, माया चव्हाण.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : सुनील ढोरे (सभापती, पदसिद्ध), वैशाली सोनवणे, आकांक्षा वाघवले.
सार्वजनिक बांधकाम समिती: गणेश म्हाळसकर(सभापती), अजय भवार, आकांक्षा वाघवले.
महिला व बालकल्याण समिती : सुनीता ढोरे (सभापती), पूनम भोसले (उपसभापती), वैशाली सोनवणे.
स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती : माया चव्हाण (सभापती), अजय म्हाळसकर, रुपाली ढोरे.


Previous Post

लोणावळा नगरपरिषदेत नियोजन समिती वगळता इतर समित्यांच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बिनविरोध निवड

Next Post

कुसगांव बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ, आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भव्य रॅली

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Santosh Raut is the official candidate of NCP in Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group Maval

कुसगांव बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ, आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भव्य रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.