व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल

मारहाणीच्या या घटनेत पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी झाले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 27, 2026
in ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
storm rages in Lonavala for one rupee Petrol pump office vandalized employees beaten up Case registered

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरातील एका पेट्रोल पंपावर १ रूपया देण्याच्या क्षुल्लक कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल भरल्यानंतर सुट्ट्या पैशाच्या वादातून काही तरुणांनी मिळून पंप कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

इतकेच नव्हे तर संतप्त टोळक्याने पंपाच्या कार्यालयाचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी ७ जणांसह इतर अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पेट्रोल पंपावर तरूण पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पेट्रोल भरून झाल्यानंतर बिल देताना केवळ ‘एक रुपया’ कमी असल्याच्या कारणावरून कर्मचारी आणि त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला हा वाद शाब्दिक होता, मात्र त्याचे रूपांतर लवकरच हिंसक संघर्षात झाले.

आरोपी तरूणांनी इतर साथीदारांना बोलावून घेत कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. मारहाणीच्या या घटनेत पेट्रोल पंपावरील कर्मचारी गंभीर जखमी झाले. हल्ला एवढा भीषण होता की आरोपींनी पंपाच्या केबिनमध्ये घुसून तिथल्या संगणकाची, काचांची आणि फर्निचरची तोडफोड केली.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली, इतर ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पीडित कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ७ निष्पन्न आरोपींसह त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

“क्षुल्लक कारणावरून कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा इशारा पोलिसांनी दिला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक
– तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
– वृक्षमित्र म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मावळमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
– यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला


Previous Post

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! संख्याबळ असूनही बाजार समितीच्या सभापती पदी भाजपच्या सदस्याची बहुमताने निवड

Next Post

Ram Navami At Tikona Fort : किल्ले तिकोणा गडावर पारंपारिक पद्धतीने श्री रामनवमी उत्सव साजरा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shri Ram Navami festival celebrated in traditional manner at Tikona Fort Maval

Ram Navami At Tikona Fort : किल्ले तिकोणा गडावर पारंपारिक पद्धतीने श्री रामनवमी उत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhumi Pujan of development works at Joshiwadi Thakarvasti in station area of ​​Talegaon Dabhade

तळेगाव शहरातील स्टेशन परिसरातील जोशीवाडी, ठाकरवस्ती येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

May 12, 2026
maharashtra Govt decision Big relief for farmers stamp duty waiver for crop loans up to Rs 2 lakh

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सभासद शेतकऱ्यांना ३ हजार १५४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

May 12, 2026
Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.