व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यांची संयुक्त बैठक संपन्न

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 28, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेमधील सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी दिनांक 20 मार्च रोजी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप लावत त्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविला होता. दुसरीकडे मुख्याधिकारी यांनी, माझ्याकडे कोणतीही फाईल प्रलंबित नसल्याचे सांगत कामाच्या बाबतीमध्ये चोख असल्याचे म्हटले होते.

दरम्यान शासकीय कार्यालयाला कुलूप लावण्याची लोकप्रतिनिधींची ही कृती कायदा व्यवस्थेला धरून नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यालयाला लावण्यात आलेले कुलूप काढले आहे.

गुरुवारी, दि. 26 मार्च रोजी सायंकाळी तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी कार्यालयाचे कुलूप खोलण्यात आले. तर, शुक्रवारी दि. 27 मार्च रोजी आमदार सुनील शेळके यांनी मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेत सर्वांना सूचना दिल्या आहेत. विकासकामे करत असताना शासन व प्रशासन यांनी एकत्रित येऊन काम केले तरच खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले आहे.

आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवारी (दि. 27 मार्च) रोजी लोणावळा नगरपरिषदेमधील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक तसेच मावळचे प्रांत अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी यांच्या भावना व मुख्याधिकारी यांची बाजू ऐकून घेतली. यानंतर मुख्याधिकारी यांनी शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी व विकासकामांना अधिकचा वेळ देण्याचे मान्य केले आहे.

सर्व लोकप्रतिनिधींनी सकारात्मकता दाखविली आहे. परंतु, मुख्याधिकारी यांनी कामकाजाच्या पद्धतीमध्ये बदल करावा व अधिकचा वेळ शहराच्या विकासासाठी द्यावा, जास्तीत जास्त वेळ कार्यालयामध्ये उपस्थित राहावे, अशा अपेक्षा सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत. तसेच, पुढील काही दिवसांमध्ये यात सुधारणा न झाल्यास आंदोलन पुन्हा उभे केले जाईल, तूर्तास ते स्थगित केले असले तरी थांबलेले नाही, असेही लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे.

आमदार सुनील शेळके व प्रांत अधिकारी यांनी बैठकीमध्ये मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या असून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जनतेच्या विकासाची कामे करा, असे सांगितले आहे. मुख्याधिकारी यांनी याबाबतीमध्ये सकारात्मक राहण्याचे सांगितल्यानंतर आमचे मनोमिलन झाले आहे. – राजेंद्र सोनवणे, नगराध्यक्ष, लोणावळा, न.प.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण


Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

Next Post

पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Rural Police Force achieves huge success in e-Governance 150 Days program

पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhumi Pujan of development works at Joshiwadi Thakarvasti in station area of ​​Talegaon Dabhade

तळेगाव शहरातील स्टेशन परिसरातील जोशीवाडी, ठाकरवस्ती येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

May 12, 2026
maharashtra Govt decision Big relief for farmers stamp duty waiver for crop loans up to Rs 2 lakh

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सभासद शेतकऱ्यांना ३ हजार १५४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

May 12, 2026
Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.