व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणग्रस्तांना न्याय मिळणार कधी? 57 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, आमदार शेळकेंनी अधिवेशन गाजवलं

पवनमावळ भागातील जनतेसाठी वरदान ठरलेलं आणि मावळवासियांसह पिंपरी-चिंचवड शहरवासियांची तहान भागवणारे पवना धरण, आज 57 वर्षे उलटून गेल्यानंतरही या भागातील धरणग्रस्तांच्या समस्या कायम आहेत

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 24, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, व्हिडिओ
Pavana-Dam-Sunil-Shelke

File Image


पवनमावळ भागातील जनतेसाठी वरदान ठरलेलं आणि मावळवासियांसह पिंपरी-चिंचवड शहरवासियांची तहान भागवणारे पवना धरण , आज 57 वर्षे उलटून गेल्यानंतरही या भागातील धरणग्रस्तांच्या समस्या कायम आहेत. पवना धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचे 57 वर्षानंतर अद्यापही पुनर्वसन झालेले नाही, ही बाब मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अधोरेखित केली.

दरम्यान, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने हे पुनर्वसन आणखी रखडले आहे. न्यायालयीन आदेशाचा मान राखून पवना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची कार्यवाही करू, असे उत्तर आमदार सुनिल शेळके यांच्या लक्षवेधीवर राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच, आमदार शेळकेंच्या आग्रहामुळे याबाबत न्यायालयाचा अडथळा येणार नाही हे पाहून दोन महिन्यात पुणे येथे बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (Maval MLA Sunil Shelke Raise Issue Of Pavana Dam project affected Peoples in Winter Session Nagpur )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पवना धरणच नाही तर आंद्रा आणि मावळ तालुक्यातील इतर धरणांसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचे अद्याप पुनर्वसन झाले नसल्याकडे आमदार शेळके यांनी लक्षवेधीद्वारे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यातही 57 वर्षे उलटल्यानंतरही पवना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी न लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. मावळातील धरणग्रस्तांचे किती दिवसांत पुनर्वसन करणार, अशी विचारणा शेळकेंनी केली होती.

त्यावर मंत्री देसाई यांनी, मुळात पवना धरणग्रस्तांना पुनर्वसन कायदा लागूच होत नसल्याचे सांगितले. तरीही मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक धरणग्रस्ताला एक एकर जमीन देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण, त्याविरोधात काही धरणग्रस्तच न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यावर ‘जैसे थे’ चा आदेश दिल्याने हे पुनर्वसन रखडल्याचे मंत्र्यांनी सांगितले. तरीही न्यायालयीन आदेश तपासून आणि निर्णयाचा आदर राखून काही मार्ग काढता येईल का, यासंदर्भात शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

हेही वाचा – ‘निधी देणार नसाल तर तसं सांगा, जाहीर सत्कार करतो’, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार शेळके आक्रमक – व्हिडिओ

“पवना प्रकल्प 1965 पूर्वीचा असून हा जलकुंभ असल्याने त्यास स्वत:चे लाभक्षेत्र नाही. त्यातील 1203 प्रकल्पग्रस्तांपैकी 340 प्रकल्पग्रस्तांना सन 1974 दरम्यान मावळ व खेड तालुक्यात पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. 863 प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करावयाचे शिल्लक आहे. त्यातील 567 प्रकल्पग्रस्तांनी तहसील कार्यालय, मावळ येथे हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. या प्रकल्पग्रस्तांना खास बाब म्हणून प्रत्येकी 1 एकर जमीन वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू प्रकल्पग्रस्तांनी अधिक जमीन मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे पर्यायी जमrन वाटपाची कार्यवाही करता आलेली नाही,” अशी माहिती मंत्री देसाई यांनी सभागृहात दिली.

अधिक वाचा –

– जयंत पाटलांच्या समर्थनार्थ युवक राष्ट्रवादी रस्त्यावर, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात वडगावात निषेध आंदोलन – व्हिडिओ
– किसान सभेच्या आंदोलनाला यश; शेतमजूर, आदिवासी समुदायाच्या बहुतांश मागण्या पुणे विभागीय आयुक्तांद्वारे मंजूर


Previous Post

जयंत पाटलांच्या समर्थनार्थ युवक राष्ट्रवादी रस्त्यावर, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात वडगावात निषेध आंदोलन – व्हिडिओ

Next Post

थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनदरम्यान पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हॉटेल व्यावसायिकांना सुचना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavla-Rural-Police

थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनदरम्यान पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हॉटेल व्यावसायिकांना सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.