“महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या सरकारचा धिक्कार असो… निर्लज्ज सरकारचा, विधानसभा अध्यक्षांचा निषेध असो… आमदार जयंत पाटीलसाहेब, आमदार सुनिल आण्णा शेळके, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…भ्रष्टाचारी सरकार हाय हाय..खोके सरकार हाय हाय…” अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस मावळ तालुका यांच्या वतीने मावळ पंचायत समिती कार्यालय, वडगाव समोर निषेध आंदोलन करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी अध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस किशोर सातकर, आशिष ढोरे, अंकुश आंबेकर, रणजित हिंगे, समीर कदम, गणेश शिंदे, साजिद इनामदार, भारत अडीवळे, शिवनाथ पडवळ, शाम पवार, चेतन थोरवे, शुभम करवंदे, अक्षय जाधव आणि युवक कार्यकर्ते उपस्थित होते. मंगेश जाधव यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. ( Nationalist Youth Congress Maval Taluka Agitation At Vadgaon Maval After Suspension of NCP MLA Jayant Patil )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन! सभागृहात मोठा गोंधळ, वाचा संपूर्ण प्रकरण
– ‘निधी देणार नसाल तर तसं सांगा, जाहीर सत्कार करतो’, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार शेळके आक्रमक – व्हिडिओ