Dainik Maval News : सध्या उन्हाची तीव्रता वाढताना दिसत असून वाढत्या उन्हामुळे जीवाची अक्षरशः काहिली होत आहे. वातावरणातील उष्मा वाढल्याने याचा त्रास प्राण्यांनाही होत असून पाळीव पशूधनाची यापार्श्वभूमीवर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे (उदा. धापा टाकणे, तोंडावाटे लाळ गळणे, अस्वस्थता) दिसून आल्यास त्वरित तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे. पशुधनावर थंड पाण्याचा मारा करावा. (अश्ववर्गीय प्राण्यांच्या बाबतीत पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे पाणी मारावे.) जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
मे महिन्यात पशुपालकांनी पशुधनाची घ्यावयाची काळजी
1. दुपारी ११ ते ५ या वेळेत जनावरे पूर्णपणे सावलीत असतील याची खात्री करावी.
2. गोठ्यात फॉगर्स (तुषार सिंचन) सुरू करावेत. तापमान ५ ते ८ अंशांनी कमी होऊ शकते.
3. जनावरांना पिण्यासाठी दिवसातून किमान ५ ते ६ वेळा स्वच्छ आणि थंड पाणी द्यावे.
4. उन्हामुळे जनावरे कमी चारा खातात. त्यामुळे रात्रीच्या वेळी ६० ते ७०% चारा द्यावा.
उन्हाळ्यात जनावरांच्या शरीरातील क्षार कमी होतात, म्हणून पाण्यातून किंवा चाऱ्यातून इलेक्ट्रोलाईट पावडर (Electrolytes) किंवा गुळ-मिठाचे पाणी द्यावे. मे महिना हा पावसाळ्यापूर्वीच्या लसीकरणासाठी सर्वात योग्य काळ आहे. घटसर्प (HS) व फऱ्या (BQ) यांसारख्या घातक आजारांचे लसीकरण या महिन्यात पूर्ण करून घ्यावे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता
