Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध प्रमुख रस्ते, तसेच गाव भाग, वाडीवस्ती यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आंदर मावळ मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे आणि भाजप पुणे जिल्हा सोशल मीडिया सहसंयोजक विकास घारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता साहेबांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी मावळ तालुक्यातील रस्त्यांवरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला ७ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. तसेच ७ दिवसांच्या आत रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डे बुजविण्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या सहभागातून ‘बकासूर भागो’ आंदोलन छेडण्यात येईल, असा तीव्र इशारा यावेळी देण्यात आला.
नागरिकांच्या जीविताशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी. केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष काम सुरू झाले पाहिजे, अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि मावळ तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी हा लढा यापुढे सुरूच राहणार आहे, असे अभिमन्यू शिंदे आणि विकास घारे यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका
– शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू
– महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद
