Dainik Maval News : बेडसे (ता. मावळ) गावातील शालिनी दहिभाते यांचे राहते घर दिनांक १९ मे रोजी लागलेल्या आगीत भस्मसात झाले होते. शॉर्ट सर्कीटमुळे अचानक लागलेल्या आगीत त्यांचे घर जळाले अन् या दुर्घटनेत संसार, घरातील जीवनावश्यक वस्तू तसेच आयुष्यभराची कमाई क्षणार्धात नष्ट झाली. त्यामुळे शालिनी दहिभाते यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले होते. शालिनीताईंच्या या संकटात मावळ भाजपाने त्यांना मदतीचा हात दिला आहे.
भाजपा पुणे जिल्हा उत्तरचे संयोजक विकास घारे यांनी सामाजिक बांधिलकी जपत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला भारतीय जनता पार्टी मावळ परिवार तसेच विविध स्तरातील सामाजिक बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर बुधवारी (दि.३ जून) माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालिनी दहिभाते यांना घर उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या विटा, लोखंडी अँगल, सिमेंट पत्रे तसेच आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. याचवेळी त्यांच्या नव्या घराच्या उभारणीचा शुभारंभही करण्यात आला.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी संकटग्रस्त कुटुंबाला धीर देत समाजाने एकत्र येऊन गरजूंच्या पाठीशी उभे राहण्याची गरज व्यक्त केली. समाजातील एकजूट, संवेदनशीलता आणि माणुसकीच्या भावनेतून उभारलेला हा मदतीचा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या प्रसंगी अभिमन्यू शिंदे, गणेश ठाकर, शंकरभाऊ लोखंडे, विकास घारे, बबन दहिभाते, दत्ता दहिभाते, विष्णु शेंडगे, पंढरीनाथ दहिभाते, चंद्रकांत दहिभाते, तानाजी शेंडगे, संजय शेंडगे, विकास दहिभाते, अनिल साबळे, विनोद दहिभाते, प्रशांत लगड, सुभाष दहिभाते, बाबाजी दहिभाते, मदन दहिभाते आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकटाच्या काळात दिलेला हा मदतीचा हात केवळ आर्थिक सहाय्य नसून समाजातील माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना