पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर असलेल्या मळवली-कामशेत या स्थानकांदरम्यान एका अंडरब्रीजच्या पुनर्निर्माणाचे काम रेल्वेकडून हाती घेण्यात आले होते. या वेळी आधीचा पूल बाजूला काढून नवा पूल बांधण्यात आला. यासाठी सुमारे दोनशे टनाच्या क्रेनचा वापर करण्यात आला. सकाळी 11 वाजता सुरू झालेले काम दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू होते. अवघ्या 5 तासात हा अंडरब्रीज बांधण्याचे काम रेल्वेकडून करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या सुमारे 13 रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या. ( Under bridge constructed between Kamshet to Malvali station in five hours on Pune Lonavla railway line )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे रेल्वे प्रशासनाने अवघ्या 5 तासांत 18 सिमेंटचे बॉक्स वापरून हा रोड अंडर ब्रीज बांधला आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने कट आणि कव्हर या पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे अगदी कमी वेळात 30 मीटर लांबीचा अंडरब्रिज बांधला गेला. यात 1.5 मीटर आणि 2 मीटरच्या आकाराचे सिमेंटचे बॉक्स ठेवून पूल बांधला गेला. यामध्ये रूळ तोडून पुन्हा जोडले जातात. त्यामुळे याला कट आणि कव्हर पद्धत म्हणून ओळखले जाते. यामुळे रुळांची मजबुतीदेखील वाढते, शिवाय भुयारी मार्गातूनही वाहनधारकांना जाणे-येणे सोपे झाले.
अधिक वाचा –
– ‘आधी पक्की घरे द्या, नंतरच राहत्या घरांना हात लावा, अन्यथा…’, किशोर आवारे यांचा प्रशासनाला इशारा
– मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी पैलवान खंडू वाळूंज यांची निवड