व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास

मावळ तालुक्यातील पाटण येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 10, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Thieves broke into 16 houses as soon as Patan village Maval was evacuated making off with gold silver cash

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पाटण येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गावातील नागरिकांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु संपूर्ण गाव रिकामे झाल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 16 घरांमध्ये घरफोडी केली आहे.

चोरट्यांनी घरांची कुलपे आणि दरवाजे तोडून प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट, लॉकर आणि सामानाची मोठ्या प्रमाणात उलथापालथ केली. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड तसंच इतर मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ केल्याची माहिती समोर आली आहे. काही घरांमध्ये सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकल्याने ग्रामस्थांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

पाटण येथे दरड कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर भीतीच्या वातावरणात प्रशासनाने गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव गाव सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेक कुटुंबे नातेवाईकांकडे किंवा सुरक्षित निवाऱ्यांमध्ये गेली होती. मात्र, याच परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने गावातील घरांना लक्ष्य केले.

ग्रामस्थ जेव्हा परत आपल्या घरी आले, तेव्हा घरांचे दरवाजे तुटलेले, कपाटे उघडलेली आणि सामानाची नासधूस झालेली पाहून त्यांना मोठा धक्का बसला. दुर्घटनेमुळे आधीच दुःखी असलेल्या कुटुंबांवर या चोरीमुळे आणखी एक संकट ओढवले आहे. अनेकांनी आयुष्यभराची जमापुंजी आणि दागिने गमावल्यानं संताप आणि हतबलता व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि स्थानिकांकडून माहिती गोळा करण्याचं काम सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं कामाला लागली आहेत. या प्रकारामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अशा आपत्कालीन परिस्थितीत रिकाम्या गावांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


dainik maval jahirat

Previous Post

पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके

Next Post

लोणावळा-कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम ! तात्पुरत्या कालावधीसाठी अनेक रेल्वेगाड्या रद्द ; 8 विशेष रेल्वेगाड्या रद्द

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mumbai Pune railway service Karjat Lonavla ghat Central Railway

लोणावळा-कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम ! तात्पुरत्या कालावधीसाठी अनेक रेल्वेगाड्या रद्द ; 8 विशेष रेल्वेगाड्या रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.