Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील पंचवटी कॉलनी परिसरात नागरिकांना विरंगुळा व आरोग्यदायी वातावरण मिळावे, या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या ‘नमो गार्डन’ योजनेअंतर्गत हे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. या जागेवर उद्यान व्हावे, यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता. पंचवटी कॉलनी, कडोलकर कॉलनी आणि ३२ बंगले परिसरातील नागरिकांसाठी ही जागा सार्वजनिक उद्यान म्हणून राखीव ठेवावी व अन्य कोणत्याही कारणासाठी तिचा वापर होऊ नये, अशी भूमिका नागरिकांनी मांडली होती.
नागरिकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी संबंधित जागा सार्वजनिक वापरासाठी राखून ठेवण्याबाबत आदेश दिला. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन आता प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाला सुरुवात होत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
भूमिपूजन कार्यक्रमास नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापपेकर, नगरसेविका हेमलता खळदे, शोभा परदेशी, सुरेखा भेगडे, भारती धोत्रे, नगरसेवक सत्यम खांडगे, चिराग खांडगे, सुरज सातकर, निखिल भगत तसेच नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक
